Tuesday, September 27, 2011

असंभव : आनंदयात्री

कशास त्याची वाट पहावी, जे
घडणे आहेच असंभव उत्तर बदलत
नाही, तरिही, करते मन आशाळू
आर्जव या काठावर जसे पोचलो,
त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे
पैलतिराचे साखर-शैशव पत्राचा
मायना तसाही बदलावा लागणार
तुजला (फक्त बदललेल्या
पत्त्यावर आता सारी पत्रे
पाठव) इथून वाटा वेगवेग़ळ्या -
तुझे चांदणे सोबत नेतो माझ्या
नशिबातील पोकळी भाळी
चंद्रामागे गोंदव अवचित
स्मरते कातरवेळी तिला वगळुनी
तिची सावली जीव तिथे अडकून
राहतो धरून काळोखाचा विस्तव
जगता ते लिहिलेच पाहिजे असली
काही सक्ती आहे? सोडुन जावे
काळापाशी दुखलेल्याही
श्वासाचे शव वाट एकही कधीच
बहुधा मुक्कामाला पोचत नाही
प्राण थांबती अर्ध्यावरती,
पुढे भटकती नुसते अवयव कविता
म्हणते - "ऐक जरासे! पाठलाग
शब्दांचा थांबव! माझ्यामध्ये
उतरत नाही हल्ली अपुल्या
नात्याची चव!" - नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Tuesday, September 20, 2011

बत्तीस तारखेला : गंगाधर मुटे

*बत्तीस तारखेला* भलत्याच
ऐनवेळी, हटकून तोल गेला नादान
सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय
झाला? सावज रणात येता, कुत्रा
पळून गेला सांगू नकोस भलते
सलतेच तू बहाणे उरलाय शब्द
केवळ, का ओल आटलेला? नेमून
लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम
केला समजायला हवे ते, समजून आज
आले काही इलाज नाही, पोटातल्या
भुकेला लोंढेच घोषणांचे
दिल्लीवरून आले येणार वित्त
आहे, बत्तीस तारखेला त्याचे
रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल
नेला? राज्यात भेकडांच्या,
जनतेस अभय नाही सोकावलाय
मृत्यू तो रक्त चाखलेला * -
गंगाधर मुटे* -----------------------------------
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, September 12, 2011

आभास : sandip

हा ओळखीचा, तुझा श्वास होता की
हा नुसताच, आभास होता पाहिले
जरा दारात, चौफेर नजरेने
धुक्यातही तुझ्याच,
चेहऱ्याचा भास होता मैफिलीत
गाताना , पापणीस ओल आली तो
ओघळणारा अश्रूही, ...जरा उदास
होता गेल्या अनेक राती,
भिजल्या अनेक वाती तो विझलेला
दिवा, माझ्या दारास होता न कधी
जमले जगणे, हा तुझाच फास होता
मरणे घेऊन जगणारा, माझाच श्वास
होता नको अता ओळखूस,
निखारयातल्या कणांना तो
पेटलेला गाव, जरा खास होता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, September 10, 2011

बेलगाम घोडा : सदिप

बेलगाम घोडा तुझ्यासाठी सुखं
मी माळत होतो, एकटाच त्या सोबत
मी दरवळत होतो. झाली
राखरांगोळी या आयुष्याची,
तुझ्यासाठीच माझा जीव मी जाळत
होतो. घटका मोजतोय शेवटच्या या
आयुष्याच्या काटेरी आठवणीं
पुन्हा-पुन्हा मी चाळत होतो.
सरींवर सरी सोसल्या या
पावसाच्या डोळ्यातल्या
अश्रुनी मला मी गाळत होतो.
होळी झाली पाहिलेल्या सगळ्या
स्वप्नांची तुझ्या
स्वप्नांच्या रंगात मी मिसळत
होतो. लगाम घातलीस तु आशा
आकांक्षा बेलगाम घोड्यासारखा
मी उधळत होतो. संदीप
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, September 9, 2011

हुंदका ओठातला पोटात नाही : supriya.jadhav7

हुंदका ओठातला पोटात नाही
प्रेम व्यवहारातले, सत्यात
नाही मोजता खोली विचारांची
कळाले बोलतो नुसतेच, आचारात
नाही हिरकणीइतकीच फरपट रोज
होते.. फक्त अमुचा लेख
अभ्यासात नाही धावतो आहेस
परदेशी कशाला...? गोष्ट कुठली
आपुल्या देशात नाही मी
तुझ्यातिल माणसावर भाळलेली
हात धरलेला कुण्या ओघात नाही
याचसाठी माफ करते सर्व काही...
सोसल्याविन सौख्य संसारात
नाही उमलणे नसतेच सोपे जाण
वेडे... का फ़ुलांनी सोसले आघात
नाही? वतनदारी राहिली ना आज
येथे अर्थ कतॄत्वातला, नावात
नाही -सुप्रिया.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Tuesday, September 6, 2011

अस्तित्व दान केले : गंगाधर मुटे

*अस्तित्व दान केले* असणेच आज
माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व
दान केले मस्तीत टाकलेल्या,
एकाच पावलाने पावित्र्य आज
माझे, दोलायमान केले हळवा नकोस
होऊ, अश्रू मला म्हणाले संतप्त
हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार
पावलांनी त्या शुभ्र
कावळ्यांनी उद्ध्वस्त रान
केले वाचाळ वल्गनांना
वैतागलो पुरेसा कानास
वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो
अजूनी निष्कपट भावनेला
देदीप्यमान केले जळले न रोज
जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला,
धारिष्ट्यवान केले - गंगाधर
मुटे ------------------------------- या रचनेचे
प्रताधिकार सुरक्षित आहेत.
-------------------------------
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/