Friday, November 25, 2011

थापाच मारणारा - : विदेश

संसार हा सुखाचा दोघात
चाललेला पत्नी मुकी मनाचा
संवाद साधलेला त्या
कुंपणावरी का ठेवू असा भरोसा
शेतास खाउनीया ज्यानेच घात
केला का सापळ्यात आला उपदेशतो
सभेला नादात तोच नेता मोहात
लालचेला थापाच मारणारा अजुनी
सभेत दिसता निवडून तोच येता
मतदार भारलेला भजनात आळवीता
भावात देव आहे बाजार का न सहता
तो भाव वाढलेला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Tuesday, November 22, 2011

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा : विदेश

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी
छानसा दूर गेली फूल पाने एकटा
मी हा असा जन्मता मी खूष झाले
का बरे गणगोतही जीव होता पुरुष
माझा नवस जन्माचा तसा देवही ना
जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी
सदा डोकावतो झोळीत माझ्या का
असा मॉलमध्ये जात असता खूप
असतो खूष मी लांब असताना
भिकारी मीच बघतो का खिसा
श्वानही वर मान करुनी आज
भुंकेना मला राव असता मान होता
आदबीचा या बसा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Sunday, November 20, 2011

पोपडे : अनिल रत्नाकर

आयुष्य आहे तोकडे माझे आहे
जगाशी वाकडे माझे मागायचे
होते मला काही वायाच गेले
काकडे माझे संसार माझा
व्यर्थची गेला हलकेच होते
तागडे माझे भेटो तिला तो देखणा
कोणी खोटेच आहे साकडे माझे
सौंदर्य आहे सांडले येथे ना
ध्यान गेले त्याकडे माझे झाकू
कशाला देह हा माझा वृत्तांत
सारे नागडे माझे पापीच होते
वागणे तेंव्हा का काढता हो
पोपडे माझे जेंव्हा नको ते
बोललो मीही का शब्द झाले बोबडे
माझे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

मिसरा कसा असावा मिसरा कसा नसावा : मयुरेश साने

मी श्वास श्वास माझे केले
तुझ्या हवाली मुर्दाड
जीवनाला माझी दया न आली का
वस्त्रहरण चाले सामान्य
माणसाचे जे फेडतात त्यांना
मिळतात रोज शाली मी पुण्यवान
किंवा पापी म्हणा हवे तर करवून
तोच घेतो माझ्यात हालचाली
कोणी नसे कुणाचे पण सोबती
हजारो मधुनीच घेत जातो माझीच
मी खुशाली ओठात नाम देवा
जेव्हा फुलून आले काट्या -
कुट्यातुनी ही अपसूक वाट झाली
हा आरसा बिलोरी वाटे मला नकोसा
तू लाज लाजता मी बघतो मलाच
गाली हासून वेदनेचे पचवा जहर
सुखाने गाऊ नका कधीही रडक्या
उदास चाली मिसरा कसा असावा
मिसरा कसा नसावा साधीच ओळ
व्हावी संवेदनेस वाली
....मयुरेश साने...दि.२०
-नोव्हेंबर -११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/