Sunday, June 6, 2010

गरीबाला कुठे सांगा कुणाला टाळणे येते? : ह बा

सरावाने अता त्या वेदना
सांभाळणे येते जरी झडले बहर
सारे तरी गंधाळणे येते खरे आहे
मला रडणे तसे जमलेच नाही हे
अता दुखर्‍या नभाखाली असे
रेंगाळणे येते जगाला माहिती
आहे मला चकवून गेली ती गरीबाला
कुठे सांगा कुणाला टाळणे येते?
तुला रडवेल हे जगणे नको सोडूस
आईला न करता पापणी ओली तिला
हाताळणे येते दिवाण्यांच्या
समूद्राशीच भिडला जन्म हा
माझा गरजणे ना कधी जमले परी
फेसाळणे येते कशी ही
प्रेयसीइतकी करंटी जाहली
मदिरा मने शमवीत जाताना हिला
घर जाळणे येते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment