Saturday, June 5, 2010

..काय मी : अनिल रत्नाकर

माझे मला ना कळे, केले काय मी?
त्या पायरीशी कसे नेले पाय मी
का चोरला घास माझ्या
त्यागातला? ते ताक होते
जळालेले, साय मी! ना राहिली ओढ,
भेटू कोणास मी? माझ्याकडे ओढले
गेले काय मी? सैतान झालाच जागा
माझ्यातला पापाकडे ह्या जीवा,
नेले, हाय! मी त्यांनीच तो
लावला लोभी सापळा ते भोवले
चोचले, मेले, काय मी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2141

No comments:

Post a Comment