मी इतिहासाचा एखादा सांधा
बहुधा माझ्यावरती गतकाळाचा
ताबा बहुधा तुझियासाठी
किंचित रडलो आणि वाटले या ही
कर्तव्यातुन झाली सुटका
बहुधा उगाच क्षणभर सळसळली
हिरमुसली झाडे धुळारल्या
पानांवर पडला तारा बहुधा ही
नात्यांची गजबज, हा पाला
पाचोळा मरण असावे निर्जनतेचा
वारा बहुधा दुनियेचा व्यापार
पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला
बहुधा अनंत ढवळे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2143
Saturday, June 5, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment