Wednesday, June 9, 2010

सहज फिराया आलेला सासरला श्रावण. : ह बा

करवंदीने रिमझिमणारा स्मरला
श्रावण घाटा घाटा वरुनी मग
वावरला श्रावण संसाराची
अक्कल नाही ना त्याला घर माहित
होते सगळे मग का वरला श्रावण?
फोलच काड्या ती वेडी जोडत
बसलेली छत्र्यांना ना आजवरी
आवरला श्रावण डोळे तेव्हा
आठवणींचे नभ बनलेले सहज
फिराया आलेला सासरला श्रावण.
ती रडताना गालावर स्वप्ने
ओघळली हरला, खचला, थरथरला
बावरला श्रावण. - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2152

No comments:

Post a Comment