Wednesday, June 2, 2010

अवेळी अशा.. : ज्ञानेश.

================= अवेळी अशा आज कोणाकडे
जायचे? कुठे घेऊनी आपले हे रडे
जायचे? मनाची कितीदातरी भिंत
मी लिंपली तरीही कुठे थांबले
हे तडे जायचे.. मला लाभली
कल्पवृक्षा तुझी सावली.. कसे
शक्य आहे अता कोरडे जायचे?
कुणाची तरी गाव चाहूल लावायचे
कुणाच्या तरी अंगणाशी सडे
जायचे तळ्याएवढा शांत मीही
तटी व्हायचो तरी स्तब्ध
पाण्यात काही खडे जायचे चला,
आपले सर्व संदेह टाकून द्या
तमातून आता उजेडाकडे जायचे.. . . .
-ज्ञानेश. ==================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment