Monday, June 7, 2010

श्वास झालो : अनिल रत्नाकर

मी कळ्यांचा श्वास झालो की
फुलांचा वास झालो ह्या सुगंधा
चाखताना भ्रुंग मी नावास झालो
सावलीला सोडले मी मी उन्हाचा
त्रास झालो पाहता ती मुग्ध अदा
आज तीचा दास झालो वाढली ती हाव
माझी मीच माझा घास झालो लाभता
सारी मला तू आज मीही पास झालो
संपला हा शेर माझा पात्र मी
शोकास झालो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2145

No comments:

Post a Comment