Wednesday, June 2, 2010

तुझ्या केसात : आदित्य_देवधर

मेघ काळे लाघवी प्रिये दाटले
केसात तुझ्या वारियाचे दूत
बावरे धावले केसात तुझ्या
संधिकाळी साठतो नभी रोज
चाफ्याचा चुरा फूल होते
पीतवर्णी माळले केसात तुझ्या
दाट आभाळातुनी असे होतसे
थेंबास कधी कोसळोनी एकदा जसे
झोकले केसात तुझ्या शुद्ध ना
गे राहते मला पांघरोनी केस
तुझे रेशमाचे स्पर्श कोवळे
लाभले केसात तुझ्या दाटता
अंधार हा कधी दूर ना व्हावा
मुळी या तमाच्या सावलीचे
सोहळे केसात तुझ्या
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment