*रहस्ये गाडली गेली तळाशी..*
कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली गेली तळाशी..
मुजोरी फक्त माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी.. *कुठे
टिंबे, रिकामी ओळ होती... कसे हे
जोडले नाते तुझ्याशी? किती
लहरी तुझ्या सांभाळल्या मी
(चकित होवून बघती ते खलाशी!)
शिळोप्याच्या सुरू गप्पा
कधीच्या बिचारे पोट बसलेले
उपाशी तिथे ढीगभर कंटाळा
असावा.. म्हणूनच झोपलेली सुस्त
माशी व्यथा हासून सांगे ',ये
जरा तू मला कवटाळ कायमचे
उराशी' म्हणे हे जवळ आले जग !
...तरी पण.. मिळे बाई कुठे गंगा नि
काशी ! * हा असा/ अशाप्रकारची
भावना असलेला शेर वाचनात आला
आहे असे राहून राहून वाटते
आहे. कुणाचा ते आठवत नाही.
क्षमस्व.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, June 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment