Friday, June 4, 2010

छानपैकी जगून गेलो मी..... : बेफिकीर

छानपैकी जगून गेलो मी छान
होतो... म्हणून गेलो मी प्यायलो
कोळुनी विषय सारे फक्त
डोक्यावरून गेलो मी चेहरा
खूपसा बदललेला काल
माझ्यापुढून गेलो मी ती
दिसावी म्हणून गेलो.. पण.. वाटले
की.. कुठून गेलो मी
पाठलागावरील आनंदा ये इथे
तू...... इथून गेलो मी शोधले
पाहिजे स्वतःलाही पार
डोक्यामधून गेलो मी वाट होती
तिथून गेले ते वाट झाली.....
जिथून गेलो मी आपलेसे कुणीच
नसण्याला..... आपलेसे करून गेलो
मी एक रस्ता असून पर्यायी आज
गावामधून गेलो मी मी खरा.......
'बेफिकीर' दु:खांनो वेळ आली
नसून गेलो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment