गोठुनी व्यापे निराशेची हवा
दारावरी वाट पाहे सांजवेळी
पारवा दारावरी सैल होता
आठवांची गुंफलेली मालती गीत
गाता सांडतो गे मारवा दारावरी
हीच का ती वाट होती हीच का माझी
कथा हीच का ती मागणारी जोगवा
दारावरी पेटला वैशाख येथे
पेटवोनी प्राक्तना कोठुनी
आणू सुखाचा गारवा दारावरी तेज
ओले होत जाता निर्बली झाली
धुनी प्राण ताजे फुंकणारा
बोलवा दारावरी वाट पाहे जीव
माझा कैक वर्षांपासुनी येउनी
गेला कुणाचा कारवा दारावरी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, June 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment