पाहते तुज पाहते लाजते मी
लाजते भावगंधित होउनी भाळते
मी भाळते मोहरून शहारती
अंगअंगीची पिसे काननी
मयुरासवे नाचते मी नाचते
फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी
हासते चंद्रकोर उजाडुनी रात
ना जावो कधी कोवळ्या
किरणांतुनी भारते मी भारते
बासरी कुठुनी बरे सूर छेडी
लाघवी कुंद धुंद सुरावरी
डोलते हिंडोलते सागरावर लाट
येता मनासी वाटते अर्पुनी
अवघे स्वत: वाहते मी वाहते
सांजवेळ किनारली, कृष्णवेडी
सावली दीप मी चरणी तुझ्या
लावते, ओवाळते अंतरी नयनातुनी
पाहिले रे मी तुला राजसा तव
मीलना, धावते मी धावते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2131
Wednesday, June 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment