Monday, June 7, 2010

कोडे : आदित्य_देवधर

आयुष्याचे कोडे कधीच सुटले
नाही उत्तर या प्रश्नाचे कधीच
सुचले नाही झाले ऐश्वर्याचे
जुने सोहळे आता स्वप्नांमधले
घोडे कधीच उठले नाही कागद कागद
ओला करतच गेली शाई अर्थालाही
कसले कारण उरले नाही कोणी आले
नाही निरोप देण्या मजला मी
गेल्यावर मागे कुणीच झुरले
नाही पानेही सळसळली हळूच येता
वारा कारण आनंदाचे कुणीच
पुसले नाही कितीक वाटा आल्या
कितीक आली वळणे आभाळाचे पाणी
कुठेच मुरले नाही वाटेवरती
माझ्या तुझी नजर उलगडली
(ओठावरती गाणे उगीच फुटले
नाही!!)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2149

No comments:

Post a Comment