Tuesday, January 17, 2012

हाय रे !! : मिलिंदा

मी माणुसकीने वागत होतो, ते
माझ्यातला अमानुषपणाच शोधत
राहिले हाय रे !! मी दु:खातही
हसवत राहिलो त्यांना, दिल्या
त्यांनीच जखमा मला हाय रे !! मी
छातिची ढाल केली त्यांच्या
साठी, त्यांनीच पाठीवर वार
केले हाय रे !! मि नेहमीच
मैत्रीसाठी हात पुढे केला
दुश्मनीतच रस घेतला त्यांनी
माझ्या हाय रे..!! मी स्वप्ने
दिली त्याना जगण्यासाठी
त्यांनीच विस्कटली स्वप्ने
माझी हाय रे !! मी रावणाचा आदर्श
सांगत होतो... त्यांनी रामालाच
सर्वस्व मानले हाय रे !! मी
माणसे जोडत राहीलो, दारे बंद
केली त्यांनी त्यांची हाय रे !!
मी झिजलो चंदन होवून ते कोळसा
उगाळत बसले हाय रे !! मी
जगण्याचे प्रयोजन करु कशाला?
जगणेच माझे,त्यांनी नाकारले
हाय रे !!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment