Tuesday, October 11, 2011

स्त्री : ganeshnikam18

जन्मताच मिळाला मरण्याचा
आशिर्वाद मला करंटी एवढी
निघाले, आईनेच नाकारले दूध मला
माझे कुठे बारसे झाले?
माझ्यासाठी कुठे जन्म सोहळा
होता? मी स्त्री म्हणून
जन्मले, हाच होता शाप मला माझी
न वाट वाकडी होती, न
चारित्र्यावर ठिपका होता मग
का यशालाही मी नको होते, आणि
सुखांनीही नाकारले मला
कोणाला मी हाक मारू, सारेच
लाचार येथे, मुठीत जीव घेऊन
जगणारे हुंदका माझा अजून
खंबीर आहे, आधारासाठी नको या
जगाचा हात मला तोडली मी यांची
सारीच बंधने, आणि घेतली उंच
भरारी पोहचले जेव्हा
शिखरावरी, दिसला सूर्यही
मावळतांना मला मी रणात अजून
उभी आहे, दु:खांनो जरा सावरून
या ही लढाई मी जिंकणारच,
स्व:तवर आहे विश्वास मला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment