Tuesday, October 11, 2011

वेधला जीव, मलूल नेत्राने : sachin.kulkarni78

आठवितो दिन, दुधात साखरेचे
येउनी भेटणे, प्रिय सखीचे ते
सर्व स्थित, न; कसाही प्रश्न
होता रोजचे भेटणे, हा प्रयास
होता सांजसंध्या, सखीने
अवतरावे प्रेम अमुचे, कसे ते
फुलवावे साखरेचे; ते दूध, आज
नासलेले घरुनी सारे; ते, विरोध
झेललेले क्षण रुतला, असा ऊरात
माझ्या त्याने पेरले, दु:ख
मनात माझ्या रोजचा दिन, रोजचा
प्रकार माझा वेळ फिरली, झाला
नकार माझा माझी न हरकत, विरोध
आप्तांचा हताश मी; त्यात,
विलाप आसवांचा हळवी ती हरली,
वितळली मनाने नकार माझा, पचवून
निरीच्छेने मीही हरलो, तश्या
वियोगाने वेधला जीव, मलूल
नेत्राने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment