Thursday, December 1, 2011

अनुमान! : प्रदीप कुलकर्णी

.................................................... *अनुमान!*
.................................................... एकटाच मी
काहीबाही बरळत बसलो! उदास झालो
कधी; कधी मी खिदळत बसलो! कसले
कसले अर्थ चिकटले या
शब्दांना...! घासघासले
एकेकाला...विसळत बसलो! गेलेला
अन् येणाराही क्षण बेचव हा...
जुनी-पुराणी दुःखे सगळी चघळत
बसलो! अजून उरले चार थेंब हे
आठवणींचे... काळ लोटला; मन माझे
मी निथळत बसलो! या जगण्याच्या
अनुमानाचे काय एवढे? कशात
काहीतरी आपले मिसळत बसलो! *-
प्रदीप कुलकर्णी *
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2723

No comments:

Post a Comment