लागली वाऱ्याने शिडावरती आग
तळपले वीजेचे ढगावरती नाग
वृक्ष एक लागला रात्रीत वठाया
मौनात विदारक माळावरती जाग
मूर्त ना बनली चक्काचुर भावना
अल्पायुष्य आणि सरणावरती साग
गलबलले यत्न गतायुष्य
पुसण्याचे उगवला नवाच
कपाळावरती डाग पेटला मांडव
तकलादू विचारांचा फुलारली
तेंव्हा ज्वालावरती बाग
निरर्थक धपापते रक्त
हृदयातले आठवणीचा ना
पारावरती माग सुस्तावले
आयूष्य विफल वाटेवर न मोह माया
ना कोणावरती राग
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, December 2, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment