Monday, December 5, 2011

सांजवेळी रोज गातो..... : makarandbehere

सांजवेळी रोज गातो मीच वेडा
मारवा तो का तुला का शोधतो गे
प्रीतवेडा पारवा तो तू
दिलेल्या त्या फुलांचा बहर ना
सरला अजूनी ती मिठी अन् तो
शहारा याद करतो गारवा तो धुंद
होते शब्द सारे धुंद होत्या दश
दिशा ही आजही होतो सुगंधी
आठवांचा कारवा तो ही फुले
कोमेजली गे काय हे सांगावयाचे
मीच माझ्या आसवांनी भिजवला गे
ताटवा तो शेज आहे, रात आहे,
रातराणी वाट पाहे शोधतो
त्याच्या प्रियेला मजसवे गे
चांदवा तो बेहेरे मकरंद
११०२६०३१
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment