** दाटून आली कातरवेळी सांज
दिवाणी/ तव अधरांना चुंबून
गेली सांज दिवाणी/ संध्यावंदन
करण्या नदीतटी संन्यासीगण /
भूलवून जाते त्यांना सुध्दा
सांज दिवाणी/ संध्याकाळी
सजणा-या त्या रातराणीला/
हिंदोळ्यावर खेळवते ना सांज
दिवाणी/ मग एकाकी होतो आपण
म्लाण मुखाने/ आठवत जाते
तिच्या मिठीतील सांज दिवाणी/
नटून थटून मग कुणी एकटे निघते
तिकडे/ वाट पाहते त्याच्याही
आधी सांज दिवाणी/ छान , मोकळ्या
अवखळणा-या केसांमधल्या/
गज-याशी त्या झोंबत असते सांज
दिवाणी/ चुडीदार मग बहरून येतो
तिने घातला/ तिच्यासवे मग बहरत
जाते सांज दिवाणी/ प्रथम
दिलेल्या पत्राचा मग दरवळ
येतो/ तिच्या तोंडूनी अवखळ
हसते सांज दिवाणी // थरथरनारा
हात पुन्हा मग ऊरी विसावे/
मंतरते त्या स्पंदानांही
सांज दिवाणी/ सात्विक स्नेहा
दिली कितीही दूषणे त्यांनी/
त्यांना सुध्दा पूरून उरते
सांज दिवाणी/
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, December 30, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment