तुझ्या नसण्याची आता सवय झाली
आहे, एकटे जगण्याची आता सवय
झाली आहे! हातात हात गुंफूनी
चाललो होतो कधी, एकटे
चालण्याची आता सवय झाली आहे!
तुझ्या वाटेतील काटे मी वेचले
होते कधी, माझ्या पायांना
काट्यांची आता सवय झाली आहे!
तुझ्या डोळयातील आसू माझे
डोळे होते प्याले, माझ्या
डोळयांना रड्ण्याची आता सवय
झाली आहे! आठ्वणींवर तुझ्या मी
जगलो असतो कसाही, आठवणींनाच
मरण्याची आता सवय झाली आहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, July 2, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment