Sunday, July 3, 2011

आले वादळ गेले वादळ... : अनंत नांदुरकर खलिश

आले वादळ गेले वादळ कसे न
मिटले आठवणींच्या वाळूवरचे
ठसे न मिटले अंतरातला कोलाहल
मी आत कोंडला या माझ्या पण
ओठावरचे हसे न मिटले जिंकुन
गेले दुर्दैवच ती कासव शर्यत
पण मनातल्या इच्छेचे ते ससे न
मिटले डोळ्यादारी प्राण
ओतुनी उभी प्रतिक्षा मिटले
होते डोळे क्षणभर जसे न मिटले
जळले विझले विझले जळले ह्रदय
कोवळे हाय तरी पण तिला हवे ते
तसे न मिटले घे खांद्यावर तुच
आपुली त्यागपताका मी वचनाचा
बांधिल माझे वसे न मिटले
.....अनंत नांदुरकर (खलिश)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment