Tuesday, August 30, 2011

क्षण एक पुरे जगण्यास खरा : मयुरेश साने

हसलास किती मज सांग जरा क्षण
एक पुरे जगण्यास खरा सुचतील
मला तितक्या गझला छळ ती ल मला
जितक्या नजरा जगणार किती
मरणार किती सुटली न कुणा बघ
येरझ रा फसवे असणे फसवे नसणे
जगण्यात तुझा नखरा न खरा सरणा
वर ही दरवळ दरवळ जगणेच जणू
गजरा गजरा मयुरेश
साने...३०-औग-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, August 22, 2011

रोज आहे.. : गुज माझे मनासवे

दोषी कुणा धरावे, अंधार फार
आहे वाती दिव्या-दिव्यांच्या
विझतात रोज आहे.! येथे भीती
कशाची, हे तर जिणे जगाचे येथेच
भ्रष्ट सोहळे सजतात रोज आहे.!
या कोवळ्या मनांचे घेणे इथे
कुणाला तिरड्याच भावनांच्या
उठतात रोज आहे.! सामान्य
जीवनाला वाली कुणीच नाही
उंबरे बड्या घरांचे झिजतात
रोज आहे.! जगणे इथे नकोसे,
सुटकाही होत नाही दीर्घायुषी
आयुष्य छळतेच रोज आहे.!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

काळ : जयन्ता५२

असाही कधी संशयी काळ येतो न
केला गुन्हा मी तरी आळ येतो
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो
घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो
चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?
कधी वाटते की जगावे जरासे कसा
नेमका न्यावया काळ येतो
------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, August 17, 2011

''मागणे'' : कैलास

गृहस्थाश्रमालाच वैरागतो मी
*जगावेगळे मागणे मागतो मी*
भिती वाटते या जगाची कश्याने?
जिथे झोप घ्यावी,तिथे जागतो मी
कुणाचे कधी फार ऐकून घेतो कधी
वाटले तोफही डागतो मी मला
वेदने का अशी गाठते तू? तुझा
सांग ना काय गे लागतो मी? कधी
सौम्य वागायचो मीहि आता जशाला
तसे तेवढे वागतो मी हजेरी तुझी
मज कधी भावलेली अता फार
''कैलास'' वैतागतो मी. -डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

''सरावाने'' : कैलास

कोंडून आसवांना डोळ्यात
सरावाने चिक्कार सहन केले
आघात सरावाने जमलेच गणित
नाही,जगण्याचे मरण्याचे
मरतोय रोज थोडा,जगण्यात
सरावाने आयुष्य
कंठल्यावर्,झोपडपट्टीमध्ये
मी वावरेन म्हणतो,नरकात
सरावाने धागा मिळतो न
सुई,दु:खीत काय घेवुन काळीज
फाटलेले,शिवतात सरावाने
लपवून वेदनेला,''कैलास''
घालतोहे सदरा सुखी
जनाचा,अंगात सरावाने.
--डॉ.कैलास गायकवाड.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, August 16, 2011

मी कुठे शोधू अता ती ओळखीची माणसे : शाम

मी कुठे शोधू अता ती ओळखीची
माणसे वेगळे केले स्वतःचे
विश्व ज्यांनी छानसे... कोरडया
होतात भेटी ओल नाही कालची फक्त
देखाव्यास उरले चेहर्‍यावरचे
हसे... रोज होतो घात माझा रोजचे
आघात हे सोकलेल्या वेदनेला हे
नवे ना फारसे... आर्त किंकाळी
कळीची आजही मी ऐकली वंशवेलीने
किती घ्यावे बळी अजुनी असे?
दूर गेली पैंजणेही उंबरा
ओलांडुनी चार भिंतींना अता या
घर म्हणावे मी कसे? रोज येण्या
वेळ होतो गोष्ट अर्धी राहते
चुंबितो मग वाट बघुनी झोपलेली
पाडसे... मी दिलेले ते खुलासे
मान्यही झाले तरी बोलणारे
बोलले काही असे काही तसे... 'शाम'
का धुंडाळतो तू माणसांना त्या
अता? घेतले उचलून ज्यांनी
सावलीचेही ठसे...
......................................................शाम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

हे फुलांचे उधान झाडांना... : वैभव देशमुख

हे फुलांचे उधान झाडांना एक
उरले न पान झाडांना थांबतो
सावलीमधे कोणी वाटतो हाच मान
झाडांना गूण हा त्या महान
झाडांचा खुटवती ते लहान
झाडांना ऐकती दूरच्या ऋतूंना
ते तीक्ष्ण असतात कान झाडांना
ते न पुसतात जात कोणाची धर्म
सारे समान झाडांना का अताशा
कमी पडे छाया पाहिजे का दुकान
झाडांना र्‍हस्व होत्या सरी
वळीवाच्या दीर्घ होती तहान
झाडांना - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2698

हे फुलांचे उधाण झाडांना... : वैभव देशमुख

हे फुलांचे उधान झाडांना एक
उरले न पान झाडांना थांबतो
सावलीमधे कोणी वाटतो हाच मान
झाडांना गूण हा त्या महान
झाडांचा खुटवती ते लहान
झाडांना ऐकती दूरच्या ऋतूंना
ते तीक्ष्ण असतात कान झाडांना
ते न पुसतात जात कोणाची धर्म
सारे समान झाडांना का अताशा
कमी पडे छाया पाहिजे का दुकान
झाडांना र्‍हस्व होत्या सरी
वळीवाच्या दीर्घ होती तहान
झाडांना - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2698

हे फुलांचे उधाण झाडांना... : वैभव देशमुख

हे फुलांचे उधाण झाडांना एक
उरले न पान झाडांना थांबतो
सावलीमधे कोणी वाटतो हाच मान
झाडांना गूण हा त्या महान
झाडांचा खुटवती ते लहान
झाडांना ऐकती दूरच्या ऋतूंना
ते तिक्ष्ण असतात कान झाडांना
ते न पुसतात जात कोणाची धर्म
सारे समान झाडांना का अताशा
कमी पडे छाया पाहिजे का दुकान
झाडांना र्‍हस्व होत्या सरी
वळीवाच्या दीर्घ होती तहान
झाडांना - वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Monday, August 15, 2011

फिरून यायचे इथे टळेल का कधी? : मिल्या

तुझे तुलाच सत्य हे, कळेल का
कधी? फिरून यायचे इथे, टळेल का
कधी? खुशाल फेक रोज घाण
त्यामधे नवी अखंड वाहता झरा
मळेल का कधी? नभाहुनी धराच
ज्यास्त ओढ लावते म्हणून पान
कोवळे गळेल का कधी? तुझ्या
कथेमधे अमूल्य अर्थ आढळे उगाच
हा समाज कळवळेल का कधी? कुकर्म
आमचेच मात्र दूषणे तुला शनी
तुझे नशीब फळफळेल का कधी? सदैव
टाकतोस तू जपून पावले तुझा ठसा
धुळीत आढळेल का कधी? गढूळता
अशी कधी कुठे न पाहिली अश्या
मनात चंद्र विरघळेल का कधी?
फटी अनेक ठेवल्यास ओंजळीस तू
सुखासुखीच ज्योत तळमळेल का
कधी? दिलीस जी व्यथा तिलाच फूल
मानले म्हणून ती सदैव दर्वळेल
का कधी? मना तुला हवे तसे घडेल
का कधी? कळेलही तुल परी वळेल का
कधी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2697

फिरून यायचे इथे टळेल का कधी? : मिल्या

तुझे तुलाच सत्य हे, कळेल का
कधी? फिरून यायचे इथे, टळेल का
कधी? खुशाल फेक रोज घाण
त्यामधे नवी अखंड वाहता झरा
मळेल का कधी? नभाहुनी धराच
ज्यास्त ओढ लावते म्हणून पान
कोवळे गळेल का कधी? तुझ्या
कथेमधे अमूल्य अर्थ आढळे उगाच
हा समाज कळवळेल का कधी? कुकर्म
आमचेच मात्र दूषणे तुला शनी
तुझे नशीब फळफळेल का कधी? सदैव
टाकतोस तू जपून पावले तुझा ठसा
धुळीत आढळेल का कधी? गढूळता
अशी कधी कुठे न पाहिली अश्या
मनात चंद्र विरघळेल का कधी?
फटी अनेक ठेवल्यास ओंजळीस तू
सुखासुखीच ज्योत तळमळेल का
कधी? दिलीस जी व्यथा तिलाच फूल
मानले म्हणून ती सदैव दर्वळेल
का कधी? मना तुला हवे तसे घडेल
का कधी? कळेलही तुल परी वळेल का
कधी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, August 13, 2011

माझी ललाटरेषा : गंगाधर मुटे

*माझी ललाटरेषा* धुंदीत
वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर
झाली तब्बेत माणसाची, आहे जटील
कोडे जी काल भ्याड होती, ती आज
शूर झाली ते वीर स्वाभिमानी,
जे झुंजले रणाला औलाद आज
त्यांची, का "जी हुजूर" झाली? घे
घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर
झाली घे हा 'अभय' पुरावा,
त्यांच्या परिश्रमाचा ती
माणसेच होती, जी कोहिनूर झाली -
गंगाधर मुटे -------------------------------
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

'काळ' माझा : राहुल राऊत

हा असा बेकार गेला काळ माझा,
राहिला आता तळाशी गाळ माझा!
थांबलो मी काळ होता धावणारा,
काळ झाला आज कर्दनकाळ माझा!
उमलली नाहीत कोठेही फुले, जन्म
ऐसा जाहला खडकाळ माझा! सांगुनी
सोडून गेली माणसे हि, एवढा
त्यांना कसा लडिवाळ माझा!
सांगतो माझी कहानी मीच मजला,
मीच विक्रम मीच अन वेताळ माझा!
राहुल राऊत, गडचिरोली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Sunday, August 7, 2011

मला सांभाळले आहे.. : ज्ञानेश.

========================= कसे घर बांधता येते
तुला ह्रदयात हातांनी ? तुला
नक्कीच आहे घडवले निष्णात
हातांनी ! कशाला आंधळा हा
चाचपडतो रोज तार्‍यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात
हातांनी कुठे वाळूतले किल्ले,
कुठे स्वप्नातले इमले किती
उधळून आलो मी, तुझ्या पश्चात
हातांनी ऋणी आहेत काही
पापण्या, कायम अशासाठी- कधीही
एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
मला कळते; तरीही वाटते की तूच
सांगावे, (जसे लाडावलेले मूल
नाही खात हातांनी ) नसू दे
स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व
आहे की- बनवल्या ओंजळी नाही
उभ्या जन्मात हातांनी ! किती
हे पारदर्शी हासणे निद्रिस्त
बाळाचे.. कुणी गोंजारते आहे
जणू स्वप्नात हातांनी ! जिथे
संवादण्याचे संपते सामर्थ्य
शब्दांचे, अशा वेळी धरावे फक्त
आपण हात हातांनी.. बनू लागेल
आता शस्त्र या प्रत्येक
दगडाचे, सुटू लागेल आता प्रश्न
हा रस्त्यात, हातांनी तसे
नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र
जाणवते.. मला सांभाळले आहे
कुण्या अज्ञात हातांनी !!
-ज्ञानेश. ==========================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2694

मला सांभाळले आहे.. : ज्ञानेश.

========================= कसे घर बांधता येते
तुला ह्रदयात हातांनी ? तुला
नक्कीच आहे घडवले निष्णात
हातांनी ! कशाला आंधळा हा
चाचपडतो रोज तार्‍यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात
हातांनी कुठे वाळूतले किल्ले,
कुठे स्वप्नातले इमले किती
उधळून आलो मी, तुझ्या पश्चात
हातांनी ऋणी आहेत काही
पापण्या, कायम अशासाठी- कधीही
एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
मला कळते; तरीही वाटते की तूच
सांगावे, (जसे लाडावलेले मूल
नाही खात हातांनी ) नसू दे
स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व
आहे की- बनवल्या ओंजळी नाही
उभ्या जन्मात हातांनी ! किती
हे पारदर्शी हासणे निद्रिस्त
बाळाचे.. कुणी गोंजारते आहे
जणू स्वप्नात हातांनी ! जिथे
संवादण्याचे संपते सामर्थ्य
शब्दांचे, अशा वेळी धरावे फक्त
आपण हात हातांनी.. बनू लागेल
आता शस्त्र या प्रत्येक
दगडाचे, सुटू लागेल आता प्रश्न
हा रस्त्यात, हातांनी तसे
नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र
जाणवते.. मला सांभाळले आहे
कुण्या अज्ञात हातांनी !!
-ज्ञानेश. ==========================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, August 5, 2011

''जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी'' : कैलास

कुणाशी बोललो नाही कधी
संवादण्यासाठी अताशा ढोल
वाजवतो जरासा गाजण्यासाठी
फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे
संपून गेल्यावर, पुन्हा आलेख
जगण्याचे ,नव्याने
आखण्यासाठी प्रकाशाने गरीबी
जाहली उघडी, बघावे का जरा
जाळून सूर्याला,पुन्हा
अंधारण्यासाठी? सदा लाथाडले
आहे जगाने दु:ख देवूनी कधी
भेटेल संधी हे जगत
झिडकारण्यासाठी नियम पाळून
कोणी ही कुठे जिंकायचा नाही
जगाचे कायदे पाळू,सुखाने
हारण्यासाठी जगाने जाणली
"कैलास"ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे
विस्तारण्यासाठी --डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, August 2, 2011

विपरीत : विजय दि. पाटील

आलिंगनामध्ये तुझ्या हल्ली
कुठे ती बात येते? काहीतरी
विपरीत "आयुष्या" तुझ्या
माझ्यात येते लांबून मी
शाब्बासकी देतो तुझ्या
फटकळपणाला अगदी स्वतःवर वेळ
आली की शिवी तोंडात येते अपघात
झालेल्या ठिकाणी थांबतो
क्षणभर परंतू लोकल अता येईल,
गेले पाहिजे.... ध्यानात येते
बिनधास्त पैसे काढले अन घेतले
मी जे हवे ते कित्येक वर्षे
हीच खोटी बातमी स्वप्नात येते
होतिल कशा गझला सफाईदार?... मोठा
प्रश्न आहे हे विस्कळित जीवन
जसे आहे तसे शेरात येते मी
मागतो इतकेच... मृत्यो, न्यायला
येशील तेव्हा तितकीच आली
पाहिजे जितकी मजा जगण्यात
येते ---------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, August 1, 2011

तुझी नजर : मिल्या

मायबोलीवर कैलास गायकवाड
ह्यांनी दिलेल्या 'खोल खोल
आतवर तुझी नजर' ह्या
मिसर्‍यावर रचलेली गझल खोल
खोल आतवर तुझी नजर काळजास
पाडते अजून घर एवढा उगाच का
चढेल ज्वर? खोल खोल आतवर तुझी
नजर घाव हा तुझा तसा जुनाच पण
आजही जखम तशीच... ओलसर एक तर
उधार चेहरा तुझा त्यात लिंपले
थरांवरून थर सांग ना सुगंध हा
लपेल का? आणतो कुठूनही तुझी
खबर तप्त अन उजाड वाळवंट मी दे
तुझेच मेघ अन तुझीच सर रंगहीन
वस्त्र जीवना तुझे दु:ख
त्यावरी करे कलाकुसर घ्यायचे
असेल तर कवेत घे पण नकोच
स्पर्श हे सटरफटर मी तुला हवा
तसा दिसेन पण आरसा जरा
स्वत:समोर धर श्वास तो शिधा
म्हणून वाटतो नवल काय जर असेल
त्यांत खर दु:ख फार तर असेल
वीतभर पाहिजे रुमाल मात्र
हातभर
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2684

गात येथे तू उगा का थांबलेला : विदेश

गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला !
जाउ दे त्याला किती उंचावरीही
- दोर आम्ही नीट त्याचा
कापलेला तोंड भरुनी मानलेला
जो सलोखा पाठ फिरताना गळा का
दाबलेला ? काल माशी ना उठे
नाकावरीची - आज मिरवी शूर नेता
गाजलेला ! शांतिचा नारा घुमे
दाही दिशांना नेम तो जनतेवरी
का रोखलेला ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2688

सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? (तरही) : supriya.jadhav7

सरहदी का शोधती मग झुंजण्याची
कारणे? (तरही) अंतरीचा घाव ताजा
गंधण्याची कारणे, काय होती
वेदना आनंदण्याची कारणे ?
साजणाचे भास होते की सुखाचे
चांदणे... मध्यराती रोमरोमी
धुंदण्याची कारणे चांदण्याची
रात्र जेव्हा मीलना खोळंबते...
लागती का हात-हाती गुंफ़ण्याची
कारणे? खेळता का डाव अर्धा,
व्यर्थ वाटू लागतो.... रास्त जर
होती मनाच्या गुंतण्याची
कारणे ना तुला कळली कधी जी, ना
मलाही गावली... उत्तरा
खोळंबलेली भांडण्याची कारणे
जो नको तो ऐनवेळी कारणाविन
गाठतो... नेमकी तू टाळली बघ
भेटण्याची कारणे यंव होती
कारणे अन त्यंव होती कारणे... का
कधी पडताळली नाकारण्याची
कारणे? एक जर बंदे खुदाचे,
ईश्वराची लेकरे... सरहदी का
शोधती मग झुंजण्याची कारणे?
श्वास-श्वासा जोडण्याला जन्म
सारा भांडले श्वास गेला
ताडताना संपण्याची कारणे शेर
सव्वा-शेर होते, गझलियत होती
जरी ना 'प्रिया' कळली गझल, ना
गंडण्याची कारणे.
-सुप्रिया(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2689

मी तुझा,तुझा असेन आमरण : कैलास

संशया करु नकोस आक्रमण मी
तुझा,तुझा असेन आमरण सांगतो
मनास, "विसरलो तुला" हीच तर
तुझी मुळात आठवण फ़ुंकणे,पिणे
असभ्य वाटले आजकाल हेच सभ्य
आचरण हासण्यास माझिया फ़सू
नका हासणे मुखावरील आवरण
बोलवे कुणी,तिथे न जायचो पोचलो
तिथे,जिथे न आवतण. डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2687