========================= कसे घर बांधता येते
तुला ह्रदयात हातांनी ? तुला
नक्कीच आहे घडवले निष्णात
हातांनी ! कशाला आंधळा हा
चाचपडतो रोज तार्यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात
हातांनी कुठे वाळूतले किल्ले,
कुठे स्वप्नातले इमले किती
उधळून आलो मी, तुझ्या पश्चात
हातांनी ऋणी आहेत काही
पापण्या, कायम अशासाठी- कधीही
एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
मला कळते; तरीही वाटते की तूच
सांगावे, (जसे लाडावलेले मूल
नाही खात हातांनी ) नसू दे
स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व
आहे की- बनवल्या ओंजळी नाही
उभ्या जन्मात हातांनी ! किती
हे पारदर्शी हासणे निद्रिस्त
बाळाचे.. कुणी गोंजारते आहे
जणू स्वप्नात हातांनी ! जिथे
संवादण्याचे संपते सामर्थ्य
शब्दांचे, अशा वेळी धरावे फक्त
आपण हात हातांनी.. बनू लागेल
आता शस्त्र या प्रत्येक
दगडाचे, सुटू लागेल आता प्रश्न
हा रस्त्यात, हातांनी तसे
नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र
जाणवते.. मला सांभाळले आहे
कुण्या अज्ञात हातांनी !!
-ज्ञानेश. ==========================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, August 7, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment