आलिंगनामध्ये तुझ्या हल्ली
कुठे ती बात येते? काहीतरी
विपरीत "आयुष्या" तुझ्या
माझ्यात येते लांबून मी
शाब्बासकी देतो तुझ्या
फटकळपणाला अगदी स्वतःवर वेळ
आली की शिवी तोंडात येते अपघात
झालेल्या ठिकाणी थांबतो
क्षणभर परंतू लोकल अता येईल,
गेले पाहिजे.... ध्यानात येते
बिनधास्त पैसे काढले अन घेतले
मी जे हवे ते कित्येक वर्षे
हीच खोटी बातमी स्वप्नात येते
होतिल कशा गझला सफाईदार?... मोठा
प्रश्न आहे हे विस्कळित जीवन
जसे आहे तसे शेरात येते मी
मागतो इतकेच... मृत्यो, न्यायला
येशील तेव्हा तितकीच आली
पाहिजे जितकी मजा जगण्यात
येते ---------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, August 2, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment