Friday, August 5, 2011

''जगाचे कायदे पाळू,सुखाने हारण्यासाठी'' : कैलास

कुणाशी बोललो नाही कधी
संवादण्यासाठी अताशा ढोल
वाजवतो जरासा गाजण्यासाठी
फ़ुकाचा शोधतो कागद,जिणे
संपून गेल्यावर, पुन्हा आलेख
जगण्याचे ,नव्याने
आखण्यासाठी प्रकाशाने गरीबी
जाहली उघडी, बघावे का जरा
जाळून सूर्याला,पुन्हा
अंधारण्यासाठी? सदा लाथाडले
आहे जगाने दु:ख देवूनी कधी
भेटेल संधी हे जगत
झिडकारण्यासाठी नियम पाळून
कोणी ही कुठे जिंकायचा नाही
जगाचे कायदे पाळू,सुखाने
हारण्यासाठी जगाने जाणली
"कैलास"ची नुकतीच श्रीमंती
जरासा संकुचित झालो ,इथे
विस्तारण्यासाठी --डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment