मी कुठे शोधू अता ती ओळखीची
माणसे वेगळे केले स्वतःचे
विश्व ज्यांनी छानसे... कोरडया
होतात भेटी ओल नाही कालची फक्त
देखाव्यास उरले चेहर्यावरचे
हसे... रोज होतो घात माझा रोजचे
आघात हे सोकलेल्या वेदनेला हे
नवे ना फारसे... आर्त किंकाळी
कळीची आजही मी ऐकली वंशवेलीने
किती घ्यावे बळी अजुनी असे?
दूर गेली पैंजणेही उंबरा
ओलांडुनी चार भिंतींना अता या
घर म्हणावे मी कसे? रोज येण्या
वेळ होतो गोष्ट अर्धी राहते
चुंबितो मग वाट बघुनी झोपलेली
पाडसे... मी दिलेले ते खुलासे
मान्यही झाले तरी बोलणारे
बोलले काही असे काही तसे... 'शाम'
का धुंडाळतो तू माणसांना त्या
अता? घेतले उचलून ज्यांनी
सावलीचेही ठसे...
......................................................शाम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, August 16, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment