Monday, August 22, 2011

रोज आहे.. : गुज माझे मनासवे

दोषी कुणा धरावे, अंधार फार
आहे वाती दिव्या-दिव्यांच्या
विझतात रोज आहे.! येथे भीती
कशाची, हे तर जिणे जगाचे येथेच
भ्रष्ट सोहळे सजतात रोज आहे.!
या कोवळ्या मनांचे घेणे इथे
कुणाला तिरड्याच भावनांच्या
उठतात रोज आहे.! सामान्य
जीवनाला वाली कुणीच नाही
उंबरे बड्या घरांचे झिजतात
रोज आहे.! जगणे इथे नकोसे,
सुटकाही होत नाही दीर्घायुषी
आयुष्य छळतेच रोज आहे.!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment