असाही कधी संशयी काळ येतो न
केला गुन्हा मी तरी आळ येतो
दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो
घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो
चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?
कधी वाटते की जगावे जरासे कसा
नेमका न्यावया काळ येतो
------------------------- जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, August 22, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment