Monday, August 15, 2011

फिरून यायचे इथे टळेल का कधी? : मिल्या

तुझे तुलाच सत्य हे, कळेल का
कधी? फिरून यायचे इथे, टळेल का
कधी? खुशाल फेक रोज घाण
त्यामधे नवी अखंड वाहता झरा
मळेल का कधी? नभाहुनी धराच
ज्यास्त ओढ लावते म्हणून पान
कोवळे गळेल का कधी? तुझ्या
कथेमधे अमूल्य अर्थ आढळे उगाच
हा समाज कळवळेल का कधी? कुकर्म
आमचेच मात्र दूषणे तुला शनी
तुझे नशीब फळफळेल का कधी? सदैव
टाकतोस तू जपून पावले तुझा ठसा
धुळीत आढळेल का कधी? गढूळता
अशी कधी कुठे न पाहिली अश्या
मनात चंद्र विरघळेल का कधी?
फटी अनेक ठेवल्यास ओंजळीस तू
सुखासुखीच ज्योत तळमळेल का
कधी? दिलीस जी व्यथा तिलाच फूल
मानले म्हणून ती सदैव दर्वळेल
का कधी? मना तुला हवे तसे घडेल
का कधी? कळेलही तुल परी वळेल का
कधी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2697

No comments:

Post a Comment