Saturday, August 13, 2011

'काळ' माझा : राहुल राऊत

हा असा बेकार गेला काळ माझा,
राहिला आता तळाशी गाळ माझा!
थांबलो मी काळ होता धावणारा,
काळ झाला आज कर्दनकाळ माझा!
उमलली नाहीत कोठेही फुले, जन्म
ऐसा जाहला खडकाळ माझा! सांगुनी
सोडून गेली माणसे हि, एवढा
त्यांना कसा लडिवाळ माझा!
सांगतो माझी कहानी मीच मजला,
मीच विक्रम मीच अन वेताळ माझा!
राहुल राऊत, गडचिरोली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment