Friday, June 3, 2011

सलते मनात काही.. : राघव

गझलेचा हा पहिलाच प्रयत्न.
त्यामुळे कल्पना नाही की
कितपत बरोबर आहे.. मृत्यो तुला
तसा मी नेहमीच पाहतो रे.. पळ
येतसे कधीचा मी वाट पाहतो रे..
लयबद्ध भावनांची आंदोलने
उसळती.. आशेसवे निराशा नेहमीच
पाहतो रे.. जगण्यात जन्म जातो
(पण) जगणेच होत नाही.. (जे-जे
मनांस खुपते, का तेच पाहतो रे?)
घनदाट जंगलातील बघ वृक्ष एकटा
तो.. स्वत:च, वाळलेल्या स्वत:स,
पाहतो रे! ढळते मनात काही..सलते
मनात काही.. गर्तेत अंतरीच्या
जाऊन पाहतो रे.. मन मोकळे करावे
ऐसे कुणीच नाही.. पण राघवास
थोडे सांगून पाहतो रे.. राघव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment