कधी होकार,कधी नकार, असं पहिलं
प्रेम माझं.. कोवळ्या मनावर
गंभीर वार,असं पहिलं प्रेम
माझं.. मला अपेक्षा साथ,प्रेम
अन मनाची तिच्या, तिला हवा
बंगला कार,असं पहिलं प्रेम
माझं.. कश्या सोबत खातात प्रेम,
हे तिला समजलेच नाही,
तिच्यामते हा "चायनीज "
प्रकार,असं पाहिलं प्रेम
माझं.. तिच्या सांगण्याला मी
पूर्व दिशा मानत गेलो, जसे मी
"माती" अन ती "कुंभार",असं पहिलं
प्रेम माझं.. काजळासाठी तिच्या
"दिपक" जळायची तयारी माझी,
प्रेम करून पण तिरस्कार,असं
पहिलं प्रेम माझं.. -दिपक सोनार
जळगाव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, June 16, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment