कशासाठी कुणासाठी झुरायाचे
उगा आता सुगंधाच्या पुन्हा
पाठी पळायाचे उगा आता धरायाची
उन्हे हाती कुणाच्या
हासण्यासाठी कुणाला सावली
देण्या जळायाचे उगा आता अता ना
तो ऋतू वेडा न वेड्या चांदण्या
तैशा नभाशी खिन्न चंद्राला
बघायाचे उगा आता मनाच्या खोल
अंधारी कुणी या ओतल्या तारा
किती आभास मी वेडे जपायाचे उगा
आता पुन्हा डोळ्यातले पाणी
पुन्हा ओठात थरथरणे कशाला ते
जुने गाणे म्हणायाचे उगा आता
कुणाला लागतो वैर मनाशी दोसती
माझी सुखाने एकमेकांना
छळायाचे उगा आता .....अनंत
नांदुरकर (खलिश)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2673
Saturday, June 25, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment