तसा फारसा खोल आघात नाही तुझा
हूंदकाही ठरावात नाही
कुणाच्या मनाचा कसा ठाव
घ्यावा कसे हातचेही हिशोबात
नाही कशाने तुझ्या बेरजा होत
गेल्या विरुनी तुझ्या अठवणी
जात नाही सुन्या काळजाच्या
किती पायवाटा प्रवासी कुणीही
प्रवासात नाही उभा जन्म जाळून
आरास केली तुझी सावलीही
निरोपात नाही उपोशण करावे
कुणीही कधीही पुढारी बनूनी
कुणी खात नाही घरी बैसलेले कसे
षंढ पाहू ? कशी आज तरवार
म्यानात नाही तुझे
मोगर्याचे हवे श्वास ताजे
तसा तेवढा मी सुवासात नाही जरी
रोज सत्कार केले फुलांनी
नशीबात माझ्या तुझा हात नाही
नको गुंतवू तू मनाला कुठेही
तुझ्या आतले भाव विश्वात नाही
मना ने मनालाच सन्मानितो मी
असा ताठ तोरा जिराफात नाही
मयुरेश साने..२२ जून ११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, June 23, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment