Tuesday, June 21, 2011

हा आहे खडतर रस्ता.. : शाम

सुख दु:खांनी भरलेला हा आहे
खडतर रस्ता जगण्याचा मार्ग
म्हणावा की आहे अडसर रस्ता ती
एक भेट ही अपुली घडली असती का
केंव्हा ? शहरात तुझ्या अन्
माझ्या नसता कुठला जर रस्ता हा
रिवाज सप्तपदीचा पाळूया आपण
दोघे मी धरीन तोलुन तुजला तू
माझा सावर रस्ता मज वचन दिले
तू जेथे त्या चौकामध्ये आता
तुकडे स्वप्नांचे करतो मज
दिसतो कातर रस्ता मग सांत्वन
करून माझे ते झोपी गेले सारे
जागला संगती माझ्या हा माझ्या
खातर रस्ता तू समजू नकोस
मृत्यो हा जन्म कोरडा गेला घे
बघून मी जाताना होईल ओलसर
रस्ता (देउन 'गझलदीप' हाती मज
लिहिते केले त्यांनी दाविला
गुरूने मजला हा इतका सुंदर
रस्ता) --शाम
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2667

No comments:

Post a Comment