Tuesday, May 31, 2011

पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला... : मयुरेश साने

पुसणारे नसताना कोणी अश्रू
ढाळायचे कशाला पतंग नसताना
ज्योतीने जीवन जाळायचे कशाला
सावलीतले भास उशाशी नको नको ते
चंद्र चांदणे पोळुन निघतो
चांदण्यात मी ऊनही टाळायचे
कशाला काटेरी नशीबाला घेउन
काटा जपतो हळूवार मन कोमेजुन
जाताना कळते कुंपण वाळायचे
कशाला फुटलेल्या काचेत
विखुरला प्रेम तुझ्यावर
करणारा आरशात मी मला दिसेना
इतके भाळायचे कशाला
प्रमाणपत्रे देउन जातील अर्थ
का कधी जगण्याला मनातुनी
ओठावर येते पुस्तक चाळायचे
कशाला मयुरेश साने ...३१- मे -११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले : मयुरेश साने

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये
ते घडून गेले सावरले मी किती
मनाला, जडू नये ते जडून गेले
नाईलाज तरी किती
म्हणावा,सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू
नये ते सडून गेले तसे इशारे
कळले होते तुला सुधा अन् मला
सुधा पण नाव तुझे ओठातच माझ्या
दडू नये ते दडून गेले नवसालाही
पावत होता तरी उपाशी विठूच
होता भक्त कुठे ही नव्हता !
पाया पडू नये ते पडून गेले
विश्वासाची बात नको रे ! गळा
कापतो केसाने काय सांगू मी !
कलीयुगीया नडू नये ते नडून
गेले सोपे साधे कधीच नसते गणीत
किचकट जगण्याचे सुटेल
म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये
ते अडून गेले मयुरेश साने .. दि
३०- मे-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2660

Monday, May 30, 2011

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले : मयुरेश साने

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये
ते घडून गेले सावरले मी किती
मनाला, जडू नये ते जडून गेले
नाईलाज तरी किती
म्हणावा,सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू
नये ते सडून गेले तसे इशारे
कळले होते तुला सुधा अन् मला
सुधा पण नाव तुझे ओठातच माझ्या
दडू नये ते दडून गेले नवसालाही
पावत होता तरी उपाशी विठूच
होता भक्त कुठे ही नव्हता !
पाया पडू नये ते पडून गेले
विश्वासाची बात नको रे ! गळा
कापतो केसाने काय सांगू मी !
कलीयुगीया नडू नये ते नडून
गेले सोपे साधे कधीच नसते गणीत
किचकट जगण्याचे सुटेल
म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये
ते अडून गेले मयुरेश साने .. दि
३०- मे-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले : मयुरेश साने

हवे हवे ते घडतच नाही, घडू नये
ते घडून गेले दूर ठेवले
प्रलोभनांना, जडू नये ते जडून
गेले नाइलाज तरी किती म्हणावा
! सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू
नये ते सडून गेले तसे इशारे
कळले होते तुला सुधा अन् मला
सुधा पण नाव तुझे ओठातच माझ्या
दडू नये ते दडून गेले नवसालाही
पावत होता तरी उपाशी विठूच
होता भक्त कुठे ही नव्हता !
पाया पडू नये ते पडून गेले
विश्वासाची बात नको रे ! गळा
कापतो केसाने काय सांगू मी !
कलीयुगात या नडू नये ते नडून
गेले सोपे साधे कधीच नसते गणीत
किचकट जगण्याचे सुटेल
म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये
ते अडून गेले मयुरेश साने .. दि
३०- मे-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, May 28, 2011

गझलेत दुखः माझे चिणणे अजून बाकी... : मयुरेश साने

आहेत श्वास चालू जगणे अजून
बाकी मरतोय रोज माझे मरणे अजून
बाकी फुलवात जीवनाची जळते
उगाच का रे जळतोय रोज माझे
जळणे अजून बाकी मन मोकळे पणाने
का हासलो कळेना पुरते मला
समजले रडणे अजून बाकी मुडदाड
माणसांना मी भेटतो कशाला
उसवून काळजाला शिवणे अजून
बाकी कविता निघे अनावर घेऊन आस
वेडी गझलेत दुखः माझे चिणणे
अजून बाकी मयुरेश साने ...दि २८-
मे -११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, May 27, 2011

तुला कधी कळेल का ? : मयुरेश साने

उमलते मनात ते तुझ्यात दरवळेल
का अबोल गीत प्रितीचे तुला कधी
कळेल का ? शब्द शब्द जुळवुनी
फुले बरीच गुंफली तुझ्या मनात
सांगना वसंत सळसळेल का ? बटेस
सावरु नकोस गुंतुदे मला जरा
मला बघून मोगरा पुन्हा पुन्हा
जळेल का ? जशी खुले कळी तशी तुझी
खुले खळी तसे हसून मोकळे नशीब
फळफळेल का ? अधीर होउनी सदा
तुझीच वाट पाहतो अधीरता
क्षणातली तुला कधी छळेल का ?
तुला स्मरून मैफलीत सूर लावतो
अता तसाच सातजन्मी सूर आपला
जुळेल का ? विचारणार तोच !
प्रश्न... शोधतात उत्तरे
प्रश्न उत्तरात जन्म सांग
घुटमळेल का ? मयुरेश साने..२७ -
मे -११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, May 24, 2011

पसारा... : श्रीधर वैद्य

प्रेमाचा हा खेळच न्यारा
रक्ताचाही उडतो पारा
म्रुत्यू काही मागत नाही
जगण्यासाठी किती पसारा एक
ओळही समजत नाही जीवन म्हणजे
गूढ उतारा गुदमरतो हा गंध
फुलांचा देना थोडा उधार वारा
इच्छा कोठे पुर्ण जाहल्या
अनेकवेळा तुटला तारा प्रा.
श्रीधर वैद्य.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

माहीत नाही... : जिज्ञासा...

फोडला कोणी घडा माहीत नाही...
मारला कोणी खडा माहीत नाही...
शांत पृथ्वीची कुणी ही आग
केली... टाकला कोणी सडा माहीत
नाही... चालणारी मी सरळ
नाकापुढे या... शब्दही मज
'वाकडा' माहीत नाही... अर्थ जातो
आसमंताहून वरती... भाव साधा,
तोकडा माहीत नाही... घाम इतका
गाळला शेतात माझ्या... की
जमीनीला तडा माहीत नाही... कु.
जिज्ञासा भावे...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

माहीत नाही.... : जिज्ञासा...

फोडला कोणी घडा माहीत नाही....
मारला कोणी खडा माहीत नाही....
शान्त पृथ्वीची कुणी ही आग
केली टाकला कोणी सडा माहीत
नाही... चालणारी मी सरळ
नाकापुढे या... शब्दही मज
'वाकडा' माहीत नाही.... अर्थ जातो
आसमंताहून वरती... भाव साधा,
तोकडा माहीत नाही.... घाम इतका
गाळला शेतात माझ्या... की
जमीनीला तडा माहीत नाही....
जिज्ञासा...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, May 23, 2011

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा : मयुरेश साने

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा
गुंतलो असाच मी जरा जरा जरा
जरा का असा खुळ्यापरी तुलाच
रोज पाहतो पाहतो मलाच मी जरा
जरा जरा जरा सांग काय टाळतात
गूज ओठ बोलके तू जशी तसाच मी
जरा जरा जरा जरा येतसे कसे मला
भरून आज एवढे वाहता झराच मी
जरा जरा जरा जरा केतकी मनात मी
सुगंध गीत गाइले रान केवडाच मी
जरा जरा जरा जरा माप टाक होउ दे
शकून मेंदिचा खरा शांत चौघडाच
मी जरा जरा जरा जरा मयुरेश
साने..दि २१- मे-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2651

मजकूर : आनंदयात्री

विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही
तुझीही वेगळी आहे कहाणी हवे जे
तुज, तुझ्या नशिबात नाही
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2653

Sunday, May 22, 2011

मजकूर : आनंदयात्री

विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही
तुझीही वेगळी आहे कहाणी हवे जे
तुज, तुझ्या नशिबात नाही
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

गावाला आलो की..... : विजय दि. पाटील

गावाला आलो की मिळते सावळ
कांती गालाला चुंबन देते
बहुदा काळी माती गोर्‍या
पोराला म्हातारा झाल्याने
बाबा बोलत नाही मोठ्याने पण
थकलेल्या वाणीचाही धाकच आहे
आम्हाला कष्टाचा पोवाडा
बिल्कुल सांगावा लागत नाही
इतक्या आवेगाने त्याची बंडी
भिडते घामाला मुलगा करतो
चिंता ह्याची मसणाच्याही
वाटेवर बक्कळ पैसा गेला माझा
बाबाच्या ह्या दुखण्याला
भावाभावामध्ये झाली इर्षा
सवते होण्याची आई चिंतित आहे
की ती जाते कुठल्या वाट्याला
--------------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, May 21, 2011

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा : मयुरेश साने

लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा
गुंतलो असाच मी जरा जरा जरा
जरा का असा खुळ्यापरी तुलाच
रोज पाहतो पाहतो मलाच मी जरा
जरा जरा जरा सांग काय टाळतात
गूज ओठ बोलके तू जशी तसाच मी
जरा जरा जरा जरा येतसे कसे मला
भरून आज एवढे वाहता झराच मी
जरा जरा जरा जरा केतकी मनात मी
सुगंध गीत गाइले रान केवडाच मी
जरा जरा जरा जरा माप टाक होउ दे
शकून मेंदिचा खरा शांत चौघडाच
मी जरा जरा जरा जरा मयुरेश
साने..दि २१- मे-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

अस्पर्श स्वप्ने : प्रसाद लिमये

बोललो होतो जरी.... विसरून पाहू
भेटलो... इतके तरी अठवून पाहू
ठेवली आहेत जी अस्पर्श
स्वप्ने ती घडी केव्हातरी
मोडून पाहू मीच लिहिलेला
'खरा' इतिहास आहे कोणत्या
रंगामधे बुडवून पाहू ? मोगरा,
चाफा, जुई, गाणी कळ्यांची
वेगळे काहीतरी याहून पाहू
वास्तवाला हात लावूही नको... चल,
रेघ स्वप्नाची जरा आखून पाहू
बोलताना संपला रस्ता अचानक
कोणत्या स्वप्नासवे परतून
पाहू ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, May 19, 2011

जन्म देवा... : अमित वाघ

टांगला जेव्हा वडाला जन्म
देवा... आत्महत्येला मिळाला
जन्म देवा... मी कसे उत्तर
तुझ्या प्रश्नास देऊ... सांग
कोणाला कळाला जन्म देवा...?
मुर्त झाली पेटण्याने आग
किंतू... काय आगीने जळाला जन्म
देवा...? राख प्रेताची नको तू
सावटू रे... दे मिळू दे हा
धुळीला जन्म देवा... जर
भविष्याची जरा चाहूल असती... तर
दिला नसता मुलाला जन्म देवा...
राहिल्या इच्छा अधूर्‍या खूप
देवा... दे म्हणोनी कावळ्याला
जन्म देवा... -अमित वाघ
८४२१११३३००: ९८२२२६५५७७.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2649

जन्म देवा... : अमित वाघ

टांगला जेव्हा वडाला जन्म
देवा... आत्महत्येला मिळाला
जन्म देवा... मी कसे उत्तर
तुझ्या प्रश्नास देऊ... सांग
कोणाला कळाला जन्म देवा...?
मुर्त झाली पेटण्याने आग
किंतू... काय आगीने जळाला जन्म
देवा...? राख प्रेताची नको तू
सावटू रे... दे मिळू दे हा
धुळीला जन्म देवा... जर
भविष्याची जरा चाहूल असती... तर
दिला नसता मुलाला जन्म देवा...
राहिल्या इच्छा अधूर्‍या खूप
देवा... दे म्हणोनी कावळ्याला
जन्म देवा... -अमित वाघ
८४२१११३३००: ९८२२२६५५७७.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, May 18, 2011

भिंती !! : supriya.jadhav7

उरल्यात चार भिंती... खचल्यात
पार भिंती !! . परजून आठवांना....
करतात वार भिंती !! आकांत
ऐकुनीही... बहि-याच ठार भिंती !!
गाठून एकटीला... छळतात फ़ार
भिंती !! सोसून पावसाळे... पडती न
'गार' भिंती !! पाहून आसवांना...
द्रवती न 'यार' भिंती !!
ओसाडश्या घराला.... ठरतात भार
भिंती !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2648

गर्भार... : रुपेश देशमुख

संयमाचे लाड केले फार
त्यांनी... अन् फुलांशी टाळला
शृंगार त्यांनी... जे
प्रकाशाचे खरे होते पुजारी...
ऐनवेळी चोरला अंधार त्यांनी...
काळजी आता भविष्याची कशाला...
वर्तमानालाच केले ठार
त्यांनी... प्रश्न जेव्हा
खानदानाचा निघाला... काढली
तेव्हा जुनी तलवार त्यांनी...
पाहिजे त्यांना ऋतू ताज्या
हवेचा... ठेवल्या दाही दिशा
गर्भार त्यांनी... * - प्रा. रुपेश
देशमुख.*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2647

भिंती !! : supriya.jadhav7

उरल्यात चार भिंती... खचल्यात
पार भिंती !! . परजून आठवांना....
करतात वार भिंती !! आकांत
ऐकुनीही... बहि-याच ठार भिंती !!
गाठून एकटीला... छळतात फ़ार
भिंती !! सोसून पावसाळे... पडती न
'गार' भिंती !! पाहून आसवांना...
द्रवती न 'यार' भिंती !!
ओसाडश्या घराला.... ठरतात भार
भिंती !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

गर्भार... : रुपेश देशमुख

संयमाचे लाड केले फार
त्यांनी... अन् फुलांशी टाळला
शृंगार त्यांनी... जे
प्रकाशाचे खरे होते पुजारी...
ऐनवेळी चोरला अंधार त्यांनी...
काळजी आता भविष्याची कशाला...
वर्तमानालाच केले ठार
त्यांनी... प्रश्न जेव्हा
खानदानाचा निघाला... काढली
तेव्हा जुनी तलवार त्यांनी...
पाहिजे त्यांना ऋतू ताज्या
हवेचा... ठेवल्या दाही दिशा
गर्भार त्यांनी... * - प्रा. रुपेश
देशमुख.*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, May 13, 2011

आवश्यक ! : ज्ञानेश.

======================== आयुष्याला
कुठल्याही द्रावाने भरणे
आवश्यक दु:खाइतके नाही आता
दु:ख विसरणे आवश्यक कुठल्या
कुठल्या संदर्भांना जडला आहे
गंध तुझा जगता जगता काही
श्वासांचे गुदमरणे आवश्यक
शब्दांनी कळणारच नाही अर्थ
तुला तारुण्याचा इथल्या मोहक
वळणांवरती पाय घसरणे आवश्यक
प्रेमाइतके सोपे उत्तर होते
माझ्या हाताशी जेव्हा वाटत
होती मज भलती समिकरणे आवश्यक
तुकडे तुकडे वेचत राहू कुठवर
अवघ्या जगण्याचे त्यापेक्षा
हे तुटलेपण आता पत्करणे
आवश्यक येणार्‍या वर्षांचा
वारा सोसत नाही स्वप्नांना
जगण्याभवती तू हातांची ओंजळ
धरणे आवश्यक दुनिया ना बघताही
तो हे खात्रीने सांगत असतो- - की
कुठल्या ग्रंथामधली कुठली
अवतरणे आवश्यक ! कळले आता साधत
नाही या अश्रूंनी काहीही..
झाले आहे डोळ्यांमध्ये रक्त
उतरणे आवश्यक ! -ज्ञानेश.
============================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2646

आवश्यक ! : ज्ञानेश.

======================== आयुष्याला
कुठल्याही द्रावाने भरणे
आवश्यक दु:खाइतके नाही आता
दु:ख विसरणे आवश्यक कुठल्या
कुठल्या संदर्भांना जडला आहे
गंध तुझा जगता जगता काही
श्वासांचे गुदमरणे आवश्यक
शब्दांनी कळणारच नाही अर्थ
तुला तारुण्याचा इथल्या मोहक
वळणांवरती पाय घसरणे आवश्यक
प्रेमाइतके सोपे उत्तर होते
माझ्या हाताशी जेव्हा वाटत
होती मज भलती समिकरणे आवश्यक
तुकडे तुकडे वेचत राहू कुठवर
अवघ्या जगण्याचे त्यापेक्षा
हे तुटलेपण आता पत्करणे
आवश्यक येणार्‍या वर्षांचा
वारा सोसत नाही स्वप्नांना
जगण्याभवती तू हातांची ओंजळ
धरणे आवश्यक दुनिया ना बघताही
तो हे खात्रीने सांगत असतो- - की
कुठल्या ग्रंथामधली कुठली
अवतरणे आवश्यक ! कळले आता साधत
नाही या अश्रूंनी काहीही..
झाले आहे डोळ्यांमध्ये रक्त
उतरणे आवश्यक ! -ज्ञानेश.
============================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

मैफील आज जमली - : विदेश

मैफील आज जमली , पण रंग नाहि
भरला नादात मी तिच्या तो
कोठेतरी विसरला ! मी देवळात
दमलो देवीस शोधताना माता घरात
दिसली दारात जीव हसला ! शोधीत
कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो -
शेजारधर्म नाते जपण्यात तो
मिसळला ! पाऊस पाहण्या मी दारी
उभा जरासा ; गळक्या छतातुनी तो
पाठीवरी बरसला ! पाठीत वार
केला तो मित्र मीच जपला वैरी
समोरुनी का जाता उगाच हसला ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Wednesday, May 11, 2011

धमन्यांत वाहते रक्त.. : बहर

धमन्यांत वाहते रक्त होऊनी
पाणी.. अन् थिजलेली.. थकलेली
माझी वाणी..! मी तिथेच आहे,
तेंव्हा जेथे होतो.. ही तुझीच
झाली प्रगती केविलवाणी..!! का
थांबलीस तू तेंव्हा जाता जाता?
परतून येत मी असता, गेलीस आणि..?
भांभाउन मीही गेलो होतो
तेंव्हा.. रडलीस तूच पण, डोळा
आले पाणी.. का ऋतू सरावा असला
बिन् "बहराचा?" ह्या वर्षी ही का
हेच पुराला पाणी??? -- बहर..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

तुझे हेच डोळे... : Rajdeep_Fool

तुझे हेच डोळे, मला पाहताना,
किती मोरपंखी, निळेशार होते,
कळ्या-पाकळ्यांचे, तुझ्या
पापण्यांचे, किती जीवघेणे, तरी
वार होते ! नभाच्या उराशी,
निळ्या ओट्-पोटी , भिनू जात
होता, जसा सांजवारा, तसे
विरघळोनि, तुझ्या ह्या
भिवांशी, मला भेटले, चांदणे
चार होते ! निळे-जांभळे, आरसे
अम्बराचे, तुझे रूप आता, मला
भेट देती, हळू चुम्बताना, तुला
मौन माझे, किती पांढरे, शुभ्र
आकार होते ! नव्या पैजणान्शी,
तुझ्या खेळताना, मला नाद छन-छन
किती घुंगरांचा, जिथे ओठ माझे,
तुझे भेटले ते, तुझे राजवर्खी
अलंकार होते ! किती बोललो मी,
तुझ्याशी तरीही, अता शब्द देती
न वाचा नव्याने, तुझे बोलके
मौन, सार्या क्षणांचे,
दिसांचे, खरे शेंदरी सार होते !
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2643

तुझे हेच डोळे... : Rajdeep_Fool

तुझे हेच डोळे, मला पाहताना,
किती मोरपंखी, निळेशार होते,
कळ्या-पाकळ्यांचे, तुझ्या
पापण्यांचे, किती जीवघेणे, तरी
वार होते ! नभाच्या उराशी,
निळ्या ओट्-पोटी , भिनू जात
होता, जसा सांजवारा, तसे
विरघळोनि, तुझ्या ह्या
भिवांशी, मला भेटले, चांदणे
चार होते ! निळे-जांभळे, आरसे
अम्बराचे, तुझे रूप आता, मला
भेट देती, हळू चुम्बताना, तुला
मौन माझे, किती पांढरे, शुभ्र
आकार होते ! नव्या पैजणान्शी,
तुझ्या खेळताना, मला नाद छन-छन
किती घुंगरांचा, जिथे ओठ माझे,
तुझे भेटले ते, तुझे राजवर्खी
अलंकार होते ! किती बोललो मी,
तुझ्याशी तरीही, आता शब्द देती
न वाचा नव्याने, तुझे बोलके
मौन, सार्या क्षणांचे,
दिसांचे, खरे शेंदरी सार होते !
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, May 9, 2011

रीत : आरना

मळ्भ का अन्तरी आज हे दाटले,
देव्हार्यात देव ही का अनोळखी
भासले.... रीत हृदयात खोल उमटली
वेदना ती कशी... जागेपणी भास
स्वप्नांचा देऊनी गेली कशी...
घाव सर्व घालणारे हात माझेच
आपले.. कसे काय म्हणावे जखम
दिली दुसर्या कुणी.. आज जाणवे
सत्य स्पष्ट जे ना कधी पहिले..
पाठ त्याकडे फिरवायची चूक हि
झाली कशी.. आज अवेळी घनघोर सरी
त्या बरसल्या.. अश्रू माझे
पुसायला कोणीतरी धावले कधी..
हायसे वाटले मग साथ त्याने तरी
दिली.. नेहमीची रीत नशिबाने आज
ही ना तोडली... ....आरना...३ मार्च
२०११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

काय बहाणे व्यर्थ हुडकता ? (मक्ताबंद गज़ल) : निशिकांत दे

मक्ताबंद गज़ल या प्रकारात
प्रत्येक शेरात शायराचे नाव
येते. काय बहाणे व्यर्थ हुडकता
हसण्यासाठी ? "निशिकांता"चे
हास्य पुरूनी उरण्यासाठी झोप
उडाली "निशिकांता"ची प्रश्न
किती ते ! एकच डुलकी यावी
स्वप्ने दिसण्यासाठी प्रेम
उमलता, मस्त कलंदर
"निशिकांता"चे डोळे होती ओले
कोणी पुसण्यासाठी पाश कधी का
तोडुन तुटती ? "निशिकांता" मग
गोफ कशाला विणला नाती
जुळण्यासाठी ? आनंदाचे वेष्टन
आहे पांघरले मी दु:ख जन्मले
"निशिकांता"चे लपण्यासाठी काय
जगी जगण्याला आहे
"निशिकांता"रे श्वास रुकेना
काय करू मी? मरण्यासाठी भार
नसावा कोणावरती "निशिकांता"चा
खोद कबर तू अपुल्या प्रेता
पुरण्यासाठी पोकळ उत्सव साज
घराचा "निशिकांता"च्या जे न
घरी ते आहे लोका पटण्यासाठी
"निशिकांता"ला दान मिळाले
एकांताचे गज़लांना मी फुलवत
असतो रमण्यासाठी निशिकांत
देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३ E
Mail nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Sunday, May 8, 2011

विसावा : प्रदीप कुलकर्णी

* विसावा* येत आहे मला चूक समजून
माझी ! मी पुन्हा वाट पाहीन
बदलून माझी ! वेळ झाली; निघावेच
लागेल आता वाट पाही कुणी दूर
ठरवून माझी! तू पुढे हात आधीच
केलास का हा...? एकदा भेट घे नीट,
जवळून माझी ! या जगाच्या
रिवाजात नाही कुठे मी रीत पटली
कुणाला न पटवून माझी ! काय
मागून मागू तुला मागणे मी?
पालखी ने अखेरीस उचलून माझी!
या जिवाला विसावा न लाभे
कुठेही... मी घरे पाहिली रोज
बदलून माझी ! *- प्रदीप
कुलकर्णी*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2638

तुलाच.. : मयुरेश

उजाडलेले आभाळ मी चांदण्यात
पाहिले होते.. माझेच डोळे मी
तुझ्यात पाहिले होते..
गारव्यात ही प्रीत झुळूक ती
तशीच थरथरणारी त्या मंद हवेत
तुला माझ्या कवेत पाहिले
होते.. मेघात अडकला चंद्र
शुभ्र, पाण्यात स्वार तो मुक्त
त्या सफेद पांढऱ्या गोळ्यात
मी तुलाच पाहिले होते.. कुजबूज
कानी पडती, सांगण्यास ओठ हे
झुकती .. त्या कानाजवळ मी हात
तुझेच पाहिले होते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, May 7, 2011

सडा : ....रसप....

आज बागेमध्ये मोग-यांचा सडा
गंधतो अंगणा पावलांचा सडा
चांद होता जरा काल राती खुळा
केव्हढा सांडला चांदण्यांचा
सडा वाहतो गार वारा शहारा उठे
लाज शृंगारण्याच्या क्षणांचा
सडा रूप ते पाहुनी आरसे दंगता
भंगले, वेचतो आज त्यांचा सडा
ही नशा राहु दे झिंगलो मी असा
पापणी पेलते मोतियांचा सडा
शायरी खुद्द ती, शब्द होते
तिचे गुंफतो "जीत" त्या
आठवांचा सडा ....रसप.... (रणजित
पराडकर)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

विसावा : प्रदीप कुलकर्णी

* विसावा* येत आहे मला चूक समजून
माझी ! मी पुन्हा वाट पाहीन
बदलून माझी ! वेळ झाली; निघावेच
लागेल आता वाट पाही कुणी दूर
ठरवून माझी! तू पुढे हात आधीच
केलास का हा...? एकदा भेट घे नीट,
जवळून माझी ! या जगाच्या
रिवाजात नाही कुठे मी रीत पटली
कुणाला न पटवून माझी ! काय
मागून मागू तुला मागणे मी?
पालखी ने अखेरीस उचलून माझी!
या जिवाला विसावा न लाभे
कुठेही... मी घरे पाहिली रोज
बदलून माझी ! *- प्रदीप
कुलकर्णी*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, May 5, 2011

घेर पोटाचा कधी मोठा नसावा : कैलास

मार द्या शब्दांतुनी,.....सोटा
नसावा त्यात अपशब्दांचिया
...साठा नसावा जाणले हे मर्म
वस्त्रे फ़ाटताना घेर पोटाचा
कधी मोठा नसावा वर
मिळावा,मुंबई,नवी मुंबईचा
खारघर,पनवेल,कामोठा नसावा काय
वर्णावी अवस्था पामराची पोट
केले रिक्त,अन लोटा नसावा लोक
तिटकारा करा माझा परंतू थेट
व्हावे बोलणे,फ़ाटा नसावा
--कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/