Wednesday, May 18, 2011

गर्भार... : रुपेश देशमुख

संयमाचे लाड केले फार
त्यांनी... अन् फुलांशी टाळला
शृंगार त्यांनी... जे
प्रकाशाचे खरे होते पुजारी...
ऐनवेळी चोरला अंधार त्यांनी...
काळजी आता भविष्याची कशाला...
वर्तमानालाच केले ठार
त्यांनी... प्रश्न जेव्हा
खानदानाचा निघाला... काढली
तेव्हा जुनी तलवार त्यांनी...
पाहिजे त्यांना ऋतू ताज्या
हवेचा... ठेवल्या दाही दिशा
गर्भार त्यांनी... * - प्रा. रुपेश
देशमुख.*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment