* विसावा* येत आहे मला चूक समजून
माझी ! मी पुन्हा वाट पाहीन
बदलून माझी ! वेळ झाली; निघावेच
लागेल आता वाट पाही कुणी दूर
ठरवून माझी! तू पुढे हात आधीच
केलास का हा...? एकदा भेट घे नीट,
जवळून माझी ! या जगाच्या
रिवाजात नाही कुठे मी रीत पटली
कुणाला न पटवून माझी ! काय
मागून मागू तुला मागणे मी?
पालखी ने अखेरीस उचलून माझी!
या जिवाला विसावा न लाभे
कुठेही... मी घरे पाहिली रोज
बदलून माझी ! *- प्रदीप
कुलकर्णी*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2638
Sunday, May 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment