======================== आयुष्याला
कुठल्याही द्रावाने भरणे
आवश्यक दु:खाइतके नाही आता
दु:ख विसरणे आवश्यक कुठल्या
कुठल्या संदर्भांना जडला आहे
गंध तुझा जगता जगता काही
श्वासांचे गुदमरणे आवश्यक
शब्दांनी कळणारच नाही अर्थ
तुला तारुण्याचा इथल्या मोहक
वळणांवरती पाय घसरणे आवश्यक
प्रेमाइतके सोपे उत्तर होते
माझ्या हाताशी जेव्हा वाटत
होती मज भलती समिकरणे आवश्यक
तुकडे तुकडे वेचत राहू कुठवर
अवघ्या जगण्याचे त्यापेक्षा
हे तुटलेपण आता पत्करणे
आवश्यक येणार्या वर्षांचा
वारा सोसत नाही स्वप्नांना
जगण्याभवती तू हातांची ओंजळ
धरणे आवश्यक दुनिया ना बघताही
तो हे खात्रीने सांगत असतो- - की
कुठल्या ग्रंथामधली कुठली
अवतरणे आवश्यक ! कळले आता साधत
नाही या अश्रूंनी काहीही..
झाले आहे डोळ्यांमध्ये रक्त
उतरणे आवश्यक ! -ज्ञानेश.
============================
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, May 13, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment