Thursday, May 19, 2011

जन्म देवा... : अमित वाघ

टांगला जेव्हा वडाला जन्म
देवा... आत्महत्येला मिळाला
जन्म देवा... मी कसे उत्तर
तुझ्या प्रश्नास देऊ... सांग
कोणाला कळाला जन्म देवा...?
मुर्त झाली पेटण्याने आग
किंतू... काय आगीने जळाला जन्म
देवा...? राख प्रेताची नको तू
सावटू रे... दे मिळू दे हा
धुळीला जन्म देवा... जर
भविष्याची जरा चाहूल असती... तर
दिला नसता मुलाला जन्म देवा...
राहिल्या इच्छा अधूर्‍या खूप
देवा... दे म्हणोनी कावळ्याला
जन्म देवा... -अमित वाघ
८४२१११३३००: ९८२२२६५५७७.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2649

No comments:

Post a Comment