Sunday, May 8, 2011

तुलाच.. : मयुरेश

उजाडलेले आभाळ मी चांदण्यात
पाहिले होते.. माझेच डोळे मी
तुझ्यात पाहिले होते..
गारव्यात ही प्रीत झुळूक ती
तशीच थरथरणारी त्या मंद हवेत
तुला माझ्या कवेत पाहिले
होते.. मेघात अडकला चंद्र
शुभ्र, पाण्यात स्वार तो मुक्त
त्या सफेद पांढऱ्या गोळ्यात
मी तुलाच पाहिले होते.. कुजबूज
कानी पडती, सांगण्यास ओठ हे
झुकती .. त्या कानाजवळ मी हात
तुझेच पाहिले होते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment