उरल्यात चार भिंती... खचल्यात
पार भिंती !! . परजून आठवांना....
करतात वार भिंती !! आकांत
ऐकुनीही... बहि-याच ठार भिंती !!
गाठून एकटीला... छळतात फ़ार
भिंती !! सोसून पावसाळे... पडती न
'गार' भिंती !! पाहून आसवांना...
द्रवती न 'यार' भिंती !!
ओसाडश्या घराला.... ठरतात भार
भिंती !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Wednesday, May 18, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment