हवे हवे ते घडतच नाही, घडू नये
ते घडून गेले सावरले मी किती
मनाला, जडू नये ते जडून गेले
नाईलाज तरी किती
म्हणावा,सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू
नये ते सडून गेले तसे इशारे
कळले होते तुला सुधा अन् मला
सुधा पण नाव तुझे ओठातच माझ्या
दडू नये ते दडून गेले नवसालाही
पावत होता तरी उपाशी विठूच
होता भक्त कुठे ही नव्हता !
पाया पडू नये ते पडून गेले
विश्वासाची बात नको रे ! गळा
कापतो केसाने काय सांगू मी !
कलीयुगीया नडू नये ते नडून
गेले सोपे साधे कधीच नसते गणीत
किचकट जगण्याचे सुटेल
म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये
ते अडून गेले मयुरेश साने .. दि
३०- मे-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2660
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment