Friday, May 27, 2011

तुला कधी कळेल का ? : मयुरेश साने

उमलते मनात ते तुझ्यात दरवळेल
का अबोल गीत प्रितीचे तुला कधी
कळेल का ? शब्द शब्द जुळवुनी
फुले बरीच गुंफली तुझ्या मनात
सांगना वसंत सळसळेल का ? बटेस
सावरु नकोस गुंतुदे मला जरा
मला बघून मोगरा पुन्हा पुन्हा
जळेल का ? जशी खुले कळी तशी तुझी
खुले खळी तसे हसून मोकळे नशीब
फळफळेल का ? अधीर होउनी सदा
तुझीच वाट पाहतो अधीरता
क्षणातली तुला कधी छळेल का ?
तुला स्मरून मैफलीत सूर लावतो
अता तसाच सातजन्मी सूर आपला
जुळेल का ? विचारणार तोच !
प्रश्न... शोधतात उत्तरे
प्रश्न उत्तरात जन्म सांग
घुटमळेल का ? मयुरेश साने..२७ -
मे -११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment