Saturday, May 21, 2011

अस्पर्श स्वप्ने : प्रसाद लिमये

बोललो होतो जरी.... विसरून पाहू
भेटलो... इतके तरी अठवून पाहू
ठेवली आहेत जी अस्पर्श
स्वप्ने ती घडी केव्हातरी
मोडून पाहू मीच लिहिलेला
'खरा' इतिहास आहे कोणत्या
रंगामधे बुडवून पाहू ? मोगरा,
चाफा, जुई, गाणी कळ्यांची
वेगळे काहीतरी याहून पाहू
वास्तवाला हात लावूही नको... चल,
रेघ स्वप्नाची जरा आखून पाहू
बोलताना संपला रस्ता अचानक
कोणत्या स्वप्नासवे परतून
पाहू ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment