Friday, April 29, 2011

ऊठ तू आता तरी : निशिकांत दे

सोसले अन्याय का रे? ऊठ तू आता
तरी षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू
आता तरी कल्पना विश्वात रमणे
शोभते का तुज असे ? सोड ते
स्वप्नील तारे ऊठ तू आता तरी
काय इतिहासात आहे? चाळसी पाने
उगा जाणण्या नवखे इशारे ऊठ तू
आता तरी भ्रष्ट सारे नष्ट
करण्या आग लावावी जगा चल जरा
शोधू निखारे ऊठ तू आता तरी
म्यान का तलवार केली? आप्त ते
कसले तुझे? गारदी ते मारणारे
ऊठ तू आता तरी का धरावी आस वेडे?
यावयाची राम तू चल शिळे,
थोतांड सारे ऊठ तू आता तरी
शेषशय्येवर हरी तुज झोप रे
येते कशी ? राज्य करती शोषणारे
ऊठ तू आता तरी बाटले कौटिल्य
आणी रामशास्त्री आजचे पेटवू
त्यांचे निवारे ऊठ तू आता तरी
श्वासही संघर्ष होता जीवनी
"निशिकांत"च्या खेळ माझा संपला
रे ऊठ तू आता तरी निशिकांत
देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail
:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2632

असे झाले तसे झाले.... : मयुरेश साने

असे झाले तसे झाले रडू आले हसे
झाले जसे झाले तसे झाले
व्यथांचेही ठसे झाले उन्हाचे
शाप सोसूनी सुखाची सावली आली
तुला चोरून बघताना मनाचे
कवडसे झाले वजाबाकी जमेची हीच
आयुष्यातली बाजू सुखाची
मर्तिके झाली दुखाचे बारसे
झाले जरा विश्वास ठेवा घात हा
अपघात नसतो हो अचानक होत जावा
त्याचसाठी भरवसे झाले कितीदा
संशयाने तोडते काळीज तू माझे
उभे आयुष्य तुजसाठी बिलोरी
आरसे झाले मयुरेश साने... दि..२३
अप्रील ११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2633

विझले निखारे : संतोष कसवणकर

का असे हे भेटती मज भेटणारे
षंढ निघती मर्द सारे भासणारे
काल ते ओकून ऐसी आग गेले आज ते
विझले निखारे पेटणारे मी कसा
विश्वास ठेवू या घडीचा दूत
शांतीचेच सूरा खुपसणारे
बोललो नाहीच मी ते काल ऐसे
बोलती आता असे ते बोलणारे ते
कसे भुंकून गेले आज येथे हेच
ते होते करूणा भाकणारे सांग
आता मी बहाणे काय देऊ कावले ते
संयमाने वागणारे मी किती मोजू
नगद पैसा जुगारी हाय हे घोडे
वरातित नाचणारे दिवस ही गेलेच
सारे फुकट आता निसटले होते
गळाला लागणारे काल ते घडलेच
काही वेगळेसे नेमके उघडेच
पडले झाकणारे फोन..9821273412/E
mail.sanhita44@gmail.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2634

रिमझिमणारी : निशिकांत दे

स्वप्नामधली माझी आहे
रिमझिमणारी वा-यावरती झुलता
झुलता दरवळणारी पा-यासम ती
चंचल आहे मी अनुभवले मुक्त नदी
ती बारा महिने खळखळणारी
पांघरले मी श्वास तिचे अन
त्याच क्षणाला भरली माझी खोल
जखमही भळभळणारी शांत पहाटे
गोड सुरावट ऐकू येई कोकिळकंठी
तीच असावी गुणगुणणारी
असण्याचा संकेत मिळे पण दृष्य
नसे ती मंद हवा ती पानांमधुनी
सळसळणारी माफक आहे आशा देवा आज
हवी मज माझ्यामधल्या
प्रतिभेवरती मरमिटणारी ओळख
नसता आज गवसली "निशिकांता"ला
गजलेसाठी हसरी बुजरी
थरथरणारी निशिकांत देशपांडे
मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2635

आईच्या पोटात कधी हा भेद कुणी का शिकले? : विजय दि. पाटील

पायाचाही विचार व्हावा हेच
कधी ना सुचले मनाप्रमाणे
चढवित गेलो, मजल्यांवरती मजले
तू, मी, माझे, तुझे, जाणले जन्म
घेतल्यापासुन आईच्या पोटात
कधी हा भेद कुणी का शिकले?
पाठशिवणिचा खेळ संपला शिशीर
वसंतातला ऋतुचक्राला छेद देत
ते झाड आज कोसळले काय मनाला
लावुन घेऊ, ध्येय गाठले नाही
बघू आणखी दिवस जाउ देतो...जमले
तर जमले! 'कणखर'तेचे शिखर मनाला
गाठुन देण्या जगतो नकोच
माझ्या भलावणीला ठिकाण
अधलेमधले ----------------------------------- विजय
दिनकर पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2636

Wednesday, April 27, 2011

आईच्या पोटात कधी हा भेद कुणी का शिकले? : विजय दि. पाटील

पायाचाही विचार व्हावा हेच
कधी ना सुचले मनाप्रमाणे
चढवित गेलो, मजल्यांवरती मजले
तू, मी, माझे, तुझे, जाणले जन्म
घेतल्यापासुन आईच्या पोटात
कधी हा भेद कुणी का शिकले?
पाठशिवणिचा खेळ संपला शिशीर
वसंतातला ऋतुचक्राला छेद देत
ते झाड आज कोसळले काय मनाला
लावुन घेऊ, ध्येय गाठले नाही
बघू आणखी दिवस जाउ देतो...जमले
तर जमले! 'कणखर'तेचे शिखर मनाला
गाठुन देण्या जगतो नकोच
माझ्या भलावणीला ठिकाण
अधलेमधले ----------------------------------- विजय
दिनकर पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, April 23, 2011

रिमझिमणारी : निशिकांत दे

स्वप्नामधली माझी आहे
रिमझिमणारी वा-यावरती झुलता
झुलता दरवळणारी पा-यासम ती
चंचल आहे मी अनुभवले मुक्त नदी
ती बारा महिने खळखळणारी
पांघरले मी श्वास तिचे अन
त्याच क्षणाला भरली माझी खोल
जखमही भळभळणारी शांत पहाटे
गोड सुरावट ऐकू येई कोकिळकंठी
तीच असावी गुणगुणणारी
असण्याचा संकेत मिळे पण दृष्य
नसे ती मंद हवा ती पानांमधुनी
सळसळणारी माफक आहे आशा देवा आज
हवी मज माझ्यामधल्या
प्रतिभेवरती मरमिटणारी ओळख
नसता आज गवसली "निशिकांता"ला
गजलेसाठी हसरी बुजरी
थरथरणारी निशिकांत देशपांडे
मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

विझले निखारे : संतोष कसवणकर

का असे हे भेटती मज भेटणारे
षंढ निघती मर्द सारे भासणारे
काल ते ओकून ऐसी आग गेले आज ते
विझले निखारे पेटणारे मी कसा
विश्वास ठेवू या घडीचा दूत
शांतीचेच सूरा खुपसणारे
बोललो नाहीच मी ते काल ऐसे
बोलती आता असे ते बोलणारे ते
कसे भुंकून गेले आज येथे हेच
ते होते करूणा भाकणारे सांग
आता मी बहाणे काय देऊ कावले ते
संयमाने वागणारे मी किती मोजू
नगद पैसा जुगारी हाय हे घोडे
वरातित नाचणारे दिवस ही गेलेच
सारे फुकट आता निसटले होते
गळाला लागणारे काल ते घडलेच
काही वेगळेसे नेमके उघडेच
पडले झाकणारे फोन..9821273412/E
mail.sanhita44@gmail.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

असे झाले तसे झाले.... : मयुरेश साने

असे झाले तसे झाले रडू आले हसे
झाले जसे झाले तसे झाले
व्यथांचेही ठसे झाले उन्हाचे
शाप सोसूनी सुखाची सावली आली
तुला चोरून बघताना मनाचे
कवडसे झाले वजाबाकी जमेची हीच
आयुष्यातली बाजू सुखाची
मर्तिके झाली दुखाचे बारसे
झाले जरा विश्वास ठेवा घात हा
अपघात नसतो हो अचानक होत जावा
त्याचसाठी भरवसे झाले कितीदा
संशयाने तोडते काळीज तू माझे
उभे आयुष्य तुजसाठी बिलोरी
आरसे झाले मयुरेश साने... दि..२३
अप्रील ११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, April 21, 2011

ऊठ तू आता तरी : निशिकांत दे

सोसले अन्याय का रे? ऊठ तू आता
तरी षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू
आता तरी कल्पना विश्वात रमणे
शोभते का तुज असे ? सोड ते
स्वप्नील तारे ऊठ तू आता तरी
काय इतिहासात आहे? चाळसी पाने
उगा जाणण्या नवखे इशारे ऊठ तू
आता तरी भ्रष्ट सारे नष्ट
करण्या आग लावावी जगा चल जरा
शोधू निखारे ऊठ तू आता तरी
म्यान का तलवार केली? आप्त ते
कसले तुझे? गारदी ते मारणारे
ऊठ तू आता तरी का धरावी आस वेडे?
यावयाची राम तू चल शिळे,
थोतांड सारे ऊठ तू आता तरी
शेषशय्येवर हरी तुज झोप रे
येते कशी ? राज्य करती शोषणारे
ऊठ तू आता तरी बाटले कौटिल्य
आणी रामशास्त्री आजचे पेटवू
त्यांचे निवारे ऊठ तू आता तरी
श्वासही संघर्ष होता जीवनी
"निशिकांत"च्या खेळ माझा संपला
रे ऊठ तू आता तरी निशिकांत
देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail
:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे : विजय दि. पाटील

तुझ्या निष्ठेवरी भाळून हा
निर्णय नवा मी देत आहे तुला
वाट्टेल तेंव्हा यायची दु:खा,
मुभा मी देत आहे जरा संधी
मिळाली की इथे चौखूर भरकटतो
म्हणूनच तुझ्या हातात माझ्या
जिंदगीचा कासरा मी देत आहे सदा
'खाऊन' ढेकर द्यायची बंदीच
पाळावी मनाने अशासाठीच
त्याला मोजका आता शिधा मी देत
आहे कधीपासून आहे चाललो मी,
लक्षही नाही कुणाचे उगा का
वाटले दुनियेस अकरावी दिशा मी
देत आहे? नशीबाची मला पर्वा
नसे हे का तिला ठाऊक नाही? जिचा
होऊन दैवाला इशारा हा खुला मी
देत आहे तुझे सारेच नाही जात
वाया राबणे माझ्याबरोबर
चिमुटभरसा तरी माझा तुला
'कणखर'पणा मी देत आहे
-------------------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2628

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? : गंगाधर मुटे

*कुठे लुप्त झाले
फुले-भीम-बापू?* किती ज्येष्ठ
आहे, किती श्रेष्ठ आहे, किती
सभ्य आहेत ही माणसे परी
माणसासारखी वागताहे, असे
चित्र नाही दिसे फारसे कधी भाट
होई सख्या चेहर्‍यांची, कधी
घोटती लाळ द्रव्यापुढे खरे
रूप दावी असे धैर्य नाही, किती
भ्रष्ट झालेत हे आरसे? "घराणे"
उभे राहिले गावगावी, कुठे
लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य
आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला,
नव्या इंडियाच्या युगाचा
नव्या कुठे लुप्त झाले
फुले-भीम-बापू, मिटवले कुणी
पावलांचे ठसे? कुणी एक वेडा
म्हणे जागवावी, अभय झोपलेली
इथे माणसे परी घेतले सोंग
ज्याने निजेचे, कळेना तया
जागवावे कसे...! . . गंगाधर मुटे
--------------------------------------------
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2631

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? : गंगाधर मुटे

*कुठे लुप्त झाले
फुले-भीम-बापू?* किती ज्येष्ठ
आहे, किती श्रेष्ठ आहे, किती
सभ्य आहेत ही माणसे परी
माणसासारखी वागताहे, असे
चित्र नाही दिसे फारसे कधी भाट
होई सख्या चेहर्‍यांची, कधी
घोटती लाळ द्रव्यापुढे खरे
रूप दावी असे धैर्य नाही, किती
भ्रष्ट झालेत हे आरसे? "घराणे"
उभे राहिले गावगावी, कुठे
लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य
आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला,
नव्या इंडियाच्या युगाचा
नव्या कुठे लुप्त झाले
फुले-भीम-बापू, मिटवले कुणी
पावलांचे ठसे? कुणी एक वेडा
म्हणे जागवावी, अभय झोपलेली
इथे माणसे परी घेतले सोंग
ज्याने निजेचे, कळेना तया
जागवावे कसे...! . . गंगाधर मुटे
--------------------------------------------
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, April 20, 2011

स्वतःच आग लावल्यासारखा : अनिरुद्ध

प्रत्येक दिवस कालच्यासारखा;
मारून- मुटकून काढल्यासारखा.
भरीस भर प्रत्येकाचा, चेहरा
तिच्या चेहर् यासारखा. खोल
जाऊन रुतला काटा, नाही सहज
काढण्यासारखा. काय सांगू कसा
जळलो? स्वतःच आग लावल्यासारखा.
वर छाया, आत शून्य प्रत्येकजण
आरश्यासारखा. घाव स्त्रवतो
आजसुद्धा, अगदी आत्ता
घातल्यासारखा. "अनिरुद्धा" कधी
हसशील, मनापासून;
हासल्यासारखा?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

नाही खचायाचे : केदार पाटणकर

नाही खचायाचे कुणाच्याही
नकाराने... -मिळतो दिलासा केवढा
नुसत्या विचाराने ! केवळ कुठे
झाले तुझे नुकसान पैशांचे?
गेलीच अब्रूही तुझी झाल्या
प्रकाराने ! हुसकून लावा
फाटकाबाहेर शंभरदा.. लोचट
पुन्हा येईल ते मागील दाराने
प्रेमामुळे होते
तुझ्यामाझ्यात काहीसे सारे
कसे ते संपले एका कराराने ?
घ्यावेत सल्ले पाहिजे तितके
दरेकाचे जावे अखेऱीला पुढे
अपुल्या विचाराने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2629

नाही खचायाचे : केदार पाटणकर

नाही खचायाचे कुणाच्याही
नकाराने... -मिळतो दिलासा केवढा
नुसत्या विचाराने ! केवळ कुठे
झाले तुझे नुकसान पैशांचे?
गेलीच अब्रूही तुझी झाल्या
प्रकाराने ! हुसकून लावा
फाटकाबाहेर शंभरदा.. लोचट
पुन्हा येईल ते मागील दाराने
प्रेमामुळे होते
तुझ्यामाझ्यात काहीसे सारे
कसे ते संपले एका कराराने ?
घ्यावेत सल्ले पाहिजे तितके
दरेकाचे जावे अखेऱीला पुढे
अपुल्या विचाराने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, April 19, 2011

तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे : विजय दि. पाटील

तुझ्या निष्ठेवरी भाळून हा
निर्णय नवा मी देत आहे तुला
वाट्टेल तेंव्हा यायची दु:खा,
मुभा मी देत आहे जरा संधी
मिळाली की इथे चौखूर भरकटतो
म्हणूनच तुझ्या हातात माझ्या
जिंदगीचा कासरा मी देत आहे सदा
'खाऊन' ढेकर द्यायची बंदीच
पाळावी मनाने अशासाठीच
त्याला मोजका आता शिधा मी देत
आहे कधीपासून आहे चाललो मी,
लक्षही नाही कुणाचे उगा का
वाटले दुनियेस अकरावी दिशा मी
देत आहे? नशीबाची मला पर्वा
नसे हे का तिला ठाऊक नाही? जिचा
होऊन दैवाला इशारा हा खुला मी
देत आहे तुझे सारेच नाही जात
वाया राबणे माझ्याबरोबर
चिमुटभरसा तरी माझा तुला
'कणखर'पणा मी देत आहे
-------------------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

निर्धार : विशाल कुलकर्णी

कै. भटसाहेबांच्या "माझ्या
धुळीचे शेवटी येथे किती कण
राहिले?" या गझलेतील "अवघ्या
विजा मी झेलल्या, सगळी उन्हे
मी सोसली" या ओळीवर रचलेली
तरही गझल. अवघ्या विजा मी
झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
बाकी न काही राहिले सगळी
सुखेही भोगली... वेचून जखमा
येथल्या विश्वात दुसर्‍या
चाललो हसलो असे जखमांवरी की
आंसवेही गोठली तो मोगरा
झुंजार, सगळे वार त्याने झेलले
वार्‍यासवे बोलायची त्याची
सवय ना मोडली हसले जरी
माझ्यावरी आयुष्यही माझे
किती, मी वेदनांची साथ या
जन्मात नाही सोडली.. आता नको
चर्चा जुन्या; वाटा नव्या
शोधायच्या नाती नव्या मनुशी
पुन्हा, मीही नव्याने जोडली !
विशाल...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, April 18, 2011

मी तरी जगतोच आहे : निशिकांत दे

वार झाले खूप मजवर मी तरी
जगतोच आहे कोरड्या डोळ्यातली
मी आसवे पुसतोच आहे लाख केला
मी नव्याने जीवनाचा
श्रीगणेशा आठवांना जीवघेण्या
ओंजळी भरतोच आहे हरवले घरपण
घराचे मान्य हे मजला तरीही रोप
तुळशीचे बनूनी अंगणी डुलतोच
आहे पर्ण मी झडलो तरीही वृक्ष
तो माझा नव्हे का ? अन्न
पुरवाया तरूला मी तळी कुजतोच
आहे चंद्रभागेच्या तिरावर
नाचतो भक्तासवे तो भक्त कुणबी
फास घेता मख्ख तो बघतोच आहे
लाखदा ललकारले पण हूल का देतोय
मृत्यू ? चक्रव्युह असते मराया
त्यात मी शिरतोच आहे अंत
कोणाचा कसा ही गौण वाटे बाब
मजला व्हायचे निर्माल्य अंती
मी तरी फुलतोच आहे ईश्वराला
मानतो मी आसरा हरल्या मनांचा
तो असो अथवा नसो, पण रोज मी
पुजतोच आहे दु:ख मी अन वेदना मी
वेगळा "निशिकांत" कोठे ? सर्व
विश्वाला पुरूनी मी असा उरतोच
आहे निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३ E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, April 16, 2011

तुझे वार थोडे.. : उर्जायन

* तुझे वार थोडे..*
* तुझे वार थोडे , हळुवार
व्हावे . कितीदा गळ्याने
सुरीला पुसावे .
* तुला पत्र आता असे मी लिहावे .
जसे लेखणीला कुणी रक्त
द्यावे !
* किती चोरले तू गळे कोकिळेचे ?
तुझा कंठ व्हाया स्वरांनी
झुरावे !
* कसे प्रेम असते? कसा जीव जातो?
अरे मूर्ख श्वासा तुला ना
कळावे .
* उभा जन्म झाला भ्रमाची
भ्रमंती .. तुझ्या सावलीला
कितीदा धरावे ?
* तुझे धुंद डोळे .. जशी
मद्यशाला . तृषेनेच आता तुझे
ओठ व्हावे !
* गडे सांत्वनांना दिली तू
प्रतिष्ठा . तुझ्या आसवांची
रुमालास नावे !
* तुझे हात नाजूक .. मउ रेशमाचे ,
सखे तू फुलांना अता
कुस्करावे!
* तुला 'सोसण्याने'मिळे मज
प्रतिष्टा. जुने घाव माझे कधी
ना भरावे !
* उन्हाच्या झळांशी लळा
लागल्यावर .. तुझ्या सावलीला
कशाला बसावे ?
* गझलकार - रवीप्रकाश संकलन -
उर्जायन.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2625

तुझे वार थोडे.. : उर्जायन

* तुझे वार थोडे..*
* तुझे वार थोडे , हळुवार
व्हावे . कितीदा गळ्याने
सुरीला पुसावे .
* तुला पत्र आता असे मी लिहावे .
जसे लेखणीला कुणी रक्त
द्यावे !
* किती चोरले तू गळे कोकिळेचे ?
तुझा कंठ व्हाया स्वरांनी
झुरावे !
* कसे प्रेम असते? कसा जीव जातो?
अरे मूर्ख श्वासा तुला ना
कळावे .
* उभा जन्म झाला भ्रमाची
भ्रमंती .. तुझ्या सावलीला
कितीदा धरावे ?
* तुझे धुंद डोळे .. जशी
मद्यशाला . तृषेनेच आता तुझे
ओठ व्हावे !
* गडे सांत्वनांना दिली तू
प्रतिष्ठा . तुझ्या आसवांची
रुमालास नावे !
* तुझे हात नाजूक .. मउ रेशमाचे ,
सखे तू फुलांना अता
कुस्करावे!
* तुला 'सोसण्याने'मिळे मज
प्रतिष्टा. जुने घाव माझे कधी
ना भरावे !
* उन्हाच्या झळांशी लळा
लागल्यावर .. तुझ्या सावलीला
कशाला बसावे ?
* गझलकार - रवीप्रकाश संकलन -
उर्जायन.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

मी तरी जगतोच आहे : निशिकांत दे

वार झाले खूप मजवर मी तरी
जगतोच आहे कोरड्या डोळ्यातली
मी आसवे पुसतोच आहे लाख केला
मी नव्याने जीवनाचा
श्रीगणेशा आठवांना जीवघेण्या
ओंजळी भरतोच आहे हरवले घरपण
घराचे मान्य हे मजला तरीही रोप
तुळशीचे बनूनी अंगणी डुलतोच
आहे पर्ण मी झडलो तरीही वृक्ष
तो माझा नव्हे का ? अन्न
पुरवाया तरूला मी तळी कुजतोच
आहे चंद्रभागेच्या तिरावर
नाचतो भक्तासवे तो भक्त कुणबी
फास घेता मख्ख तो बघतोच आहे
लाखदा ललकारले पण हूल का देतोय
मृत्यू ? चक्रव्युह असते मराया
त्यात मी शिरतोच आहे अंत
कोणाचा कसा ही गौण वाटे बाब
मजला व्हायचे निर्माल्य अंती
मी तरी फुलतोच आहे ईश्वराला
मानतो मी आसरा हरल्या मनांचा
तो असो अथवा नसो, पण रोज मी
पुजतोच आहे दु:ख मी अन वेदना मी
वेगळा "निशिकांत" कोठे ? सर्व
विश्वाला पुरूनी मी असा उरतोच
आहे निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३ E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, April 15, 2011

य़ा जगण्याचे... : आनंदयात्री

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक
वाटत नाही चंद्रही तसा
पूर्वीइतका सुंदर भासत नाही
कसली किंमत करता तुम्ही
माझ्या त्या नात्याची? ऐपत
नाही घेण्याची, देण्याची दानत
नाही! छोट्यामोठ्या दु:खांचे
संचार भोगतो आहे एकहि आदिम
तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही
रोज विचारु नका तुम्ही मज
तिच्या उत्तराबद्दल इच्छा
मजला उरली नाही, तुमची संपत
नाही! बोलत असतो केवळ आम्ही,
नाते अबोल अमुचे (कारण आम्हा
त्याची भाषा बहुधा समजत नाही)
जे सुचते ते लिहून जातो, उलटत
जातो पाने जगल्याचे कुठलेच
पुरावे मनात ठेवत नाही
गमावण्याचे भय सरता माणूस
बेफ़िकिर होतो जे आहे
त्याचीही किंमत बहुधा राहत
नाही अजूनही त्या पत्रांमधली
थरथर तशीच आहे (कविता
सुचण्यासाठी बाकी काही लागत
नाही) - नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2623

य़ा जगण्याचे... : आनंदयात्री

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक
वाटत नाही चंद्रही तसा
पूर्वीइतका सुंदर भासत नाही
कसली किंमत करता तुम्ही
माझ्या त्या नात्याची? ऐपत
नाही घेण्याची, देण्याची दानत
नाही! छोट्यामोठ्या दु:खांचे
संचार भोगतो आहे एकहि आदिम
तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही
रोज विचारु नका तुम्ही मज
तिच्या उत्तराबद्दल इच्छा
मजला उरली नाही, तुमची संपत
नाही! बोलत असतो केवळ आम्ही,
नाते अबोल अमुचे (कारण आम्हा
त्याची भाषा बहुधा समजत नाही)
जे सुचते ते लिहून जातो, उलटत
जातो पाने जगल्याचे कुठलेच
पुरावे मनात ठेवत नाही
गमावण्याचे भय सरता माणूस
बेफ़िकिर होतो जे आहे त्याचीही
किंमत बहुधा राहत नाही अजूनही
त्या पत्रांमधली थरथर तशीच
आहे (कविता सुचण्यासाठी बाकी
काही लागत नाही) - नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

नामानिराळे : संतोष कसवणकर

भोगणारे भोगुनी,नामानिराळे
पाप सारे ते,भल्या माथी झळाळे
चेहर्‍यावर ते
किती,त्यांच्या मुखोटे हे बरे
तुज,जे खरे खोटे कळाले दोर
जेव्हा कापले,मी परतण्याचे
सोबती अर्ध्यातुनी,मागे
पळाले त्या पुरामागून, आली
वादळेही सांत्वनाचे पत्र,ते
आता मिळाले काय तू,आलीस ती ही
या अवेळी काळजाचे पीळही, आता
जळाले विसरलो सारेच
पाढे,जीवनाचे शेवटी जमवू कसे
हे ठोकताळे फोन...9821273412
E-mail..sanhita44@yahoo.in
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2622

नामानिराळे : संतोष कसवणकर

भोगणारे भोगुनी,नामानिराळे
पाप सारे ते,भल्या माथी झळाळे
चेहर्‍यावर ते
किती,त्यांच्या मुखोटे हे बरे
तुज,जे खरे खोटे कळाले दोर
जेव्हा कापले,मी परतण्याचे
सोबती अर्ध्यातुनी,मागे
पळाले त्या पुरामागून, आली
वादळेही सांत्वनाचे पत्र,ते
आता मिळाले काय तू,आलीस ती ही
या अवेळी काळजाचे पीळही, आता
जळाले विसरलो सारेच
पाढे,जीवनाचे शेवटी जमवू कसे
हे ठोकताळे फोन...9821273412
E-mail..sanhita44@yahoo.in
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, April 13, 2011

एखादा तरी... : मी अभिजीत

आज श्वासांनो भरा हुंकार
एखादा तरी चेतवा राखेतुनी
अंगार एखादा तरी कोठवर टिकणार
कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार
एखादा तरी साथ दे वा स्वप्न दे
वा आठवांचा गाव दे दे जगायाला
मला आधार एखादा तरी जीवनी झाले
किती आरोह अन् अवरोहही
काळजाला स्पर्शु दे गंधार
एखादा तरी रिक्त हाताने कसा
परतू तुला भेटून मी काळजावरती
हवा ना वार एखादा तरी चालली
आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा
तरी आस ही ठेऊन हल्ली दैव गझला
वाचते शब्द माझा यायचा लाचार
एखादा तरी -- अभिजीत दाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2619

आराम पहिल्या सारखा : निशिकांत दे

इतिहास पुसला, पीत नाही जाम
पहिल्या सारखा कोठे मनाला
वाटतो आराम पहिल्या सारखा ? मी
कास धरली सभ्यतेची काय झाला
फायदा ? लोकास वाटे आजही बदनाम
पहिल्या सारखा का स्वप्न
गरिबांना दिसे श्रीमंत
होण्याचे फुका ? घामास कोठे आज
मिळतो दाम पहिल्या सारखा ?
होण्यास मी मोठे जरासे
मुखवट्यांना घातले वस्तीत
माझ्या आज नाही आम पहिल्या
सारखा मी झाकतो डोळे घरी देवास
स्मरतो अंतरी देवालयी दिसतो
कुठे श्रीराम पहिल्या सारखा ?
होता सुगी शेतातली दुसरीकडे
मी का उडू ? केंव्हा तरी परतेल
तो हंगाम पहिल्या सारखा
गोंगाट इतका जाहला वनवास आता
भावतो कोठे दिसेना कालचा
विश्राम पहिल्या सारखा
शरपंजरी पडलास पण "निशिकांत"
केला बेत का ? छेडावयाचा आजही
संग्राम पहिल्या सारखा
निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३ E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2621

नवा घाव : संतोष कसवणकर

जरा साकळू दे, नवा घाव आहे पुढे
वेदनेचा,नवा गाव आहे अता घे
भरूनी, इथे श्वास ताजा
विहरण्यास तेथे,कुठे वाव आहे
कशी घातली तू, बळेची शपथ ती तरी
हे तुझे येथ, घुमजाव आहे कसा
बापडा रंक, झोपे भुकेला इथे
ढेकरातच,कुणी राव आहे कसे
नित्य येथे, उलटतीच फासे कळेना
कसा हा, तुझा डाव आहे कधी मोकळे
श्वास, घेशील का तू? तुझ्याच
परिघांती, तुझी धाव आहे कुठे
पंख पसरू, मला सांग येथे
पुरेशा नभाची, मला हाव आहे
फोन.....9821273412
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2620

आराम पहिल्या सारखा : निशिकांत दे

इतिहास पुसला, पीत नाही जाम
पहिल्या सारखा कोठे मनाला
वाटतो आराम पहिल्या सारखा ? मी
कास धरली सभ्यतेची काय झाला
फायदा ? लोकास वाटे आजही बदनाम
पहिल्या सारखा का स्वप्न
गरिबांना दिसे श्रीमंत
होण्याचे फुका ? घामास कोठे आज
मिळतो दाम पहिल्या सारखा ?
होण्यास मी मोठे जरासे
मुखवट्यांना घातले वस्तीत
माझ्या आज नाही आम पहिल्या
सारखा मी झाकतो डोळे घरी देवास
स्मरतो अंतरी देवालयी दिसतो
कुठे श्रीराम पहिल्या सारखा ?
होता सुगी शेतातली दुसरीकडे
मी का उडू ? केंव्हा तरी परतेल
तो हंगाम पहिल्या सारखा
गोंगाट इतका जाहला वनवास आता
भावतो कोठे दिसेना कालचा
विश्राम पहिल्या सारखा
शरपंजरी पडलास पण "निशिकांत"
केला बेत का ? छेडावयाचा आजही
संग्राम पहिल्या सारखा
निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३ E Mail :- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

नवा घाव : संतोष कसवणकर

जरा साकळू दे, नवा घाव आहे पुढे
वेदनेचा,नवा गाव आहे अता घे
भरूनी, इथे श्वास ताजा
विहरण्यास तेथे,कुठे वाव आहे
कशी घातली तू, बळेची शपथ ती तरी
हे तुझे येथ, घुमजाव आहे कसा
बापडा रंक, झोपे भुकेला इथे
ढेकरातच,कुणी राव आहे कसे
नित्य येथे, उलटतीच फासे कळेना
कसा हा, तुझा डाव आहे कधी मोकळे
श्वास, घेशील का तू? तुझ्याच
परिघांती, तुझी धाव आहे कुठे
पंख पसरू, मला सांग येथे
पुरेशा नभाची, मला हाव आहे
फोन.....9821273412
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, April 12, 2011

एखादा तरी... : मी अभिजीत

आज श्वासांनो भरा हुंकार
एखादा तरी चेतवा राखेतुनी
अंगार एखादा तरी कोठवर टिकणार
कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार
एखादा तरी साथ दे वा स्वप्न दे
वा आठवांचा गाव दे दे जगायाला
मला आधार एखादा तरी जीवनी झाले
किती आरोह अन् अवरोहही
काळजाला स्पर्शू दे गंधार
एखादा तरी रिक्त हाताने कसा
परतू तुला भेटून मी काळजावरती
हवा ना वार एखादा तरी चालली
आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा
तरी आस ही ठेऊन हल्ली दैव गझला
वाचते शब्द माझा यायचा लाचार
एखादा तरी -- अभिजीत दाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2619

एखादा तरी... : मी अभिजीत

आज श्वासांनो भरा हुंकार
एखादा तरी चेतवा राखेतुनी
अंगार एखादा तरी कोठवर टिकणार
कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार
एखादा तरी साथ दे वा स्वप्न दे
वा आठवांचा गाव दे दे जगायाला
मला आधार एखादा तरी जीवनी झाले
किती आरोह अन् अवरोहही
काळजाला स्पर्शू दे गंधार
एखादा तरी रिक्त हाताने कसा
परतू तुला भेटून मी काळजावरती
हवा ना वार एखादा तरी चालली
आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा
तरी आस ही ठेऊन हल्ली दैव गझला
वाचते शब्द माझा यायचा लाचार
एखादा तरी -- अभिजीत दाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, April 11, 2011

चिडता का हो ? : निशिकांत दे

वेडे मी जगतास म्हणालो चिडता
का हो? कुचकामी इतिहास म्हणालो
चिडता का हो? श्रीमंतीच्या
ओंगळवाण्या प्रदर्शनाला
गरिबीचा उपहास म्हणालो चिडता
का हो खटपट केली मंत्री झाले
ते दरबारी श्रेष्ठी घरचे दास
म्हणालो चिडता का हो? उंची
कपडे ओळख झाली या नेत्यांची
खादीचा हा -हास म्हणालो चिडता
का हो? लम्बे चौडे भाषण
त्यांचे ऐकू कैसे? मिनिटाला मी
तास म्हणालो चिडता का हो? काळे
धंदे काळी करनी रुतबा त्याना
काळा मी सुर्यास म्हणालो
चिडता का हो? लफडी उघडी करण्या
लिहिती त्या शूराना वंदन
करुनी व्यास म्हणालो चिडता का
हो? निर्मोही बाबांच्या पदरी
पैसा अडका ढोंग्याना बकवास
म्हणालो चिडता का हो?
गोंगाटाने नवगीताच्या डोके
उठले सप्तसुराना श्वास
म्हणालो चिडता का हो? भडकाऊ
प्रक्षेपण बघता टी व्ही वरती
"सह्याद्री"ला पास म्हणालो
चिडता का हो? हसणे "निशिकांतास"
मिळाले जगता जगता ग्रिष्माला
मधुमास म्हणालो चिडता क हो?
निशिकांत देशपांडे
प्रतिसादाची प्रतिक्षा मोब न
98907 99023 e mail nishides1944@yahoo.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2615

मुक्तक(१) : निशिकांत दे

मुक्तक हा काव्य प्रकार
प्रथमच आजमावत आहे. चू.भू.दे.घे.
श्रीगणेशा मुक्तकांचा आज
केला यार हो खटखटाया मी निवडले
आज नवखे दार हो सुप्त होते
विसरलेले स्वप्न लिहिण्याचे
नवे दाद रसिकांची जरूरी
व्हावया साकार हो
----------------------------------------------------- वाचले मी
द्रौपदीला कौरवांनी त्रासले
वस्त्रहरणाच्या व्यथेने सर्व
जग हेलावले चूक होती
पांडवांची शंभरांना दोष का?
सर्व हरता का तयांनी तिज पणाला
लावले? ---------------------------------------------------------
देत जा जखमा मला तू वेदनांचेही
झरे भळभळू दे अन पडू दे लाख
ह्रदयाला चरे झेलता तव घाव
ताजे विसरतो मी त्या जुन्या
वेदनांना अन मनाला वाटते थोडे
बरे ---------------------------------------------------------
"प्रेम आहे" सांगण्याला वेळ
केला केवढा ? श्वास सरले
थांबण्याला वेळ नव्हता तेवढा
दीप तू कबरीवरी मी लावलेला
पाहिला होऊनी सबजा(#) उगवलो मोद
झाला एवढा
---------------------------------------------------------- (#)
तुळसीच्या जातीतले एक रोपटे
जे कबरीजवळ लावले जाते.
निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३ E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Sunday, April 10, 2011

मुलगी : बापू१११

मुलगी असे अपुली माय दुधावरची
आपुट साय शुभेच्छांनी जपे
घरास परसातली व्याकुळ गाय
उमजे तिला दु:ख आधी अपंगाचा
होते पाय उडे गोंधळ पडे प्रश्न
उकल शोधुन देते राय जवळ नसते
जेव्हा कधी माझ्यापाशी उरते
काय?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, April 8, 2011

चिडता का हो ? : निशिकांत दे

वेडे मी जगतास म्हणालो चिडता
का हो? कुचकामी इतिहास म्हणालो
चिडता का हो? श्रीमंतीच्या
ओंगळवाण्या प्रदर्शनाला
गरिबीचा उपहास म्हणालो चिडता
का हो खटपट केली मंत्री झाले
ते दरबारी श्रेष्ठी घरचे दास
म्हणालो चुकले का हो? उंची
कपडे ओळख झाली या नेत्यांची
खादीचा हा -हास म्हणालो चुकले
का हो? लम्बे चौडे भाषण
त्यांचे ऐकू कैसे? मिनिटाला मी
तास म्हणालो चुकले का हो? काळे
धंदे काळी करनी रुतबा त्याना
काळा मी सुर्यास म्हणालो
चिडता का हो? लफडी उघडी करण्या
लिहिती त्या शूराना वंदन
करुनी व्यास म्हणालो चिडता का
हो? निर्मोही बाबांच्या पदरी
पैसा अडका ढोंग्याना बकवास
म्हणालो चिडता का हो?
गोंगाटाने नवगीताच्या डोके
उठले सप्तसुराना श्वास
म्हणालो चिडता का हो? भडकाऊ
प्रक्षेपण बघता टी व्ही वरती
"सह्याद्री"ला पास म्हणालो
चिडता का हो? हसणे "निशिकांतास"
मिळाले जगता जगता ग्रिष्माला
मधुमास म्हणालो चिडता क हो?
निशिकांत देशपांडे
प्रतिसादाची प्रतिक्षा मोब न
98907 99023 e mail nishides1944@yahoo.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2615

'प्याला' अर्धा भरला.... अर्धा रिकामा होता !! : supriya.jadhav7

'प्याला' अर्धा भरला.... अर्धा
रिकामा होता !! अट्टाहास
जिण्याचा मोठा दिवाणा होता...
'प्याला' अर्धा भरला.... अर्धा
रिकामा होता !! काय देवू उत्तरे,
गुलाबी तुझ्या पत्रांची...
'सिल-बंद' आयुष्य अन.... कोरा
लिफ़ाफ़ा होता !! नितीमुल्ये
कधीची... बासणात बांधलेली...
मुखवट्यांच्या राज्यात...सारा
दिखावा होता !! दाही दिशा भरकटे,
अस्थिर मनाचा तांडा ...
प्राजक्त आठवांचा....थोडा
विसावा होता !! स्वर्गातच
बांधतात गाठी म्हणे
लग्नाच्या... पदरी पडला
माझ्या...जळता निखारा होता !!
वारसा हक्कच जणू ! ...'राजपद'
श्रीमंतांचे.... कायदा मात्र
येथे....गरीब बिचारा होता !! भिक
नको मागू 'प्रिया' योग्य
न्याय-निवाड्याची... घडल्या
पाप-पुण्यांचा...'वरती' लिखावा
होता !! -सुप्रिया(जोशी)जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

चिडता का हो ? : निशिकांत दे

वेडे मी जगतास म्हणालो चिडता
का हो? कुचकामी इतिहास म्हणालो
चिडता का हो? श्रीमंतीच्या
ओंगळवाण्या प्रदर्शनाला
गरिबीचा उपहास म्हणालो चिडता
का हो खटपट केली मंत्री झाले
ते दरबारी श्रेष्ठी घरचे दास
म्हणालो चुकले का हो? उंची
कपडे ओळख झाली या नेत्यांची
खादीचा हा -हास म्हणालो चुकले
का हो? लम्बे चौडे भाषण
त्यांचे ऐकू कैसे? मिनिटाला मी
तास म्हणालो चुकले का हो? काळे
धंदे काळी करनी रुतबा त्याना
काळा मी सुर्यास म्हणालो
चिडता का हो? लफडी उघडी करण्या
लिहिती त्या शूराना वंदन
करुनी व्यास म्हणालो चिडता का
हो? निर्मोही बाबांच्या पदरी
पैसा अडका ढोंग्याना बकवास
म्हणालो चिडता का हो?
गोंगाटाने नवगीताच्या डोके
उठले सप्तसुराना श्वास
म्हणालो चिडता का हो? भडकाऊ
प्रक्षेपण बघता टी व्ही वरती
"सह्याद्री"ला पास म्हणालो
चिडता का हो? हसणे "निशिकांतास"
मिळाले जगता जगता ग्रिष्माला
मधुमास म्हणालो चिडता क हो?
निशिकांत देशपांडे
प्रतिसादाची प्रतिक्षा मोब न
98907 99023 e mail nishides1944@yahoo.com
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

'पेला' अर्धा भरला.... अर्धा रिकामा होता !! : supriya.jadhav7

'पेला' अर्धा भरला.... अर्धा
रिकामा होता !!. जगण्याचा
अट्टाहास मोठा दिवाणा होता...
'पेला' अर्धा भरला.... अर्धा
रिकामा होता !! काय देवू उत्तरे,
तुझ्या गुलाबी पत्रांची...
'सिल-बंद' आयुष्य हे.... कोरा
लिफ़ाफ़ा होता !! नितीमुल्ये
कधीची बासणात बांधलेली...
मुखवट्यांच्या राज्यात...सारा
दिखावा होता !! दाही दिशा भरकटे,
अस्थिर मनाचा तांडा ...
प्राजक्त आठवांचा....थोडा
विसावा होता !! स्वर्गातच
बांधतात म्हणे गाठी
लग्नाच्या... पदरी पडला
माझ्या...जळता निखारा होता !!
वारसा हक्कच जणू! 'राजपद'
श्रीमंतांचे.... कायदा मात्र
येथे....गरीब बिचारा होता !! भिक
नको मागू 'प्रिया' ख-या
न्याय-निवाड्याची... केल्या
पाप-पुण्यांचा...'वरती' लिखावा
होता !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Thursday, April 7, 2011

जखमा जुन्या (गझल ) : मनिषा नाईक.

*जखमा जुन्या (गझल ) का मोगरा
उशाला, तू माळतेस आता काळीज
आठवांनी, का जाळतेस आता मोडून
स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस
आता गेला निघून गेला तांडा
नव्या दिशेला त्याच्या खुणा
कशाला सांभाळतेस आता काळास
दोष नाही वेळाच थांबलेल्या का
जाहल्या चुकांना मग चाळतेस
आता सारे तुझेच होते झोळीत जे
मिळाले डोळ्यातले झरे का ते
गाळतेस आता आक्रोश या 'मनी'चा
कोणास ना कळाला जखमा जुन्या
कशाला तू पाळतेस आता मनिषा
(माऊ)....... दि .७.०४.२०११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2613

*

जखमा जुन्या (गझल ) : मनिषा नाईक.

*जखमा जुन्या (गझल ) का मोगरा
उशाला, तू माळतेस आता काळीज
आठवांनी, का जाळतेस आता मोडून
स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस
आता गेला निघून गेला तांडा
नव्या दिशेला त्याच्या खुणा
कशाला सांभाळतेस आता काळास
दोष नाही वेळाच थांबलेल्या का
जाहल्या चुकांना मग चाळतेस
आता सारे तुझेच होते झोळीत जे
मिळाले डोळ्यातले झरे का ते
गाळतेस आता आक्रोश या 'मनी'चा
कोणास ना कळाला जखमा जुन्या
कशाला तू पाळतेस आता मनिषा
(माऊ)....... दि .७.०४.२०११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

*

छायेलाही त्यांच्या थोडा : निशिकांत दे

अपुल्यांपासुन दूर जरा मी
फटकुन आहे छायेलाही
त्यांच्या थोडा बिचकुन आहे
विश्वासाचा घात कधी ना शत्रू
करतो अपुल्यांचा तो हक्क,
तयांना दचकुन आहे बोथट झालो
शल्य मनाला बोचत नाही हळव्या
भावांना मी आलो झटकुन आहे
तरुणाईला दोष कशाला? मीच
कदाचित बुरसटल्या मुल्यातच
बसलो अडकुन आहे गजलेच्या
क्षेत्रात कुणीही नेता नाही
हिरवी कुरणे दुसरी चरतो
हुडकुन आहे भ्रष्टाचार
विरोधी बैठक उधळायाला
बरबटलेला मंत्री आला हटकुन
आहे लाचेवरती अंकुश आता एकच
"अण्णा" छोटीशी चिनगारी गेली
भडकुन आहे वृत्तातच का गजला
लिहितो? आज उमगले या
क्षेत्रीच्या श्रेष्ठ जनांना
वचकुन आहे एकच मार्गी जीवन
होते "निशिकांता"चे वाटा दिसता
लाखो, गेलो भटकुन आहे निशिकांत
देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail
:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2612

छायेलाही त्यांच्या थोडा : निशिकांत दे

अपुल्यांपासुन दूर जरा मी
फटकुन आहे छायेलाही
त्यांच्या थोडा बिचकुन आहे
विश्वासाचा घात कधी ना शत्रू
करतो अपुल्यांचा तो हक्क,
तयांना दचकुन आहे बोथट झालो
शल्य मनाला बोचत नाही हळव्या
भावांना मी आलो झटकुन आहे
तरुणाईला दोष कशाला? मीच
कदाचित बुरसटल्या मुल्यातच
बसलो अडकुन आहे गजलेच्या
क्षेत्रात कुणीही नेता नाही
हिरवी कुरणे दुसरी चरतो
हुडकुन आहे भ्रष्टाचार
विरोधी बैठक उधळायाला
बरबटलेला मंत्री आला हटकुन
आहे लाचेवरती अंकुश आता एकच
"अण्णा" छोटीशी चिनगारी गेली
भडकुन आहे वृत्तातच का गजला
लिहितो? आज उमगले या
क्षेत्रीच्या श्रेष्ठ जनांना
वचकुन आहे एकच मार्गी जीवन
होते "निशिकांता"चे वाटा दिसता
लाखो, गेलो भटकुन आहे निशिकांत
देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail
:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे : विजय दि. पाटील

तुझ्या लक्षात ना आले जिथे
संकेत येण्याचे पुरावे कोणते
मीही तुला द्यावेत येण्याचे?
सदा डोक्यात करता घोळका नाना
विचारांनो जराही भान नाही का
तुम्हा रांगेत येण्याचे? तुला
कारण नसावे एकही टाळायला भेटी
निमित्ते लाख माझी रद्द
होण्या बेत येण्याचे मला माझा
बरा होता जरासा लांबचा रस्ता
निघाले अर्थ नाही ते तुझ्या
वाटेत येण्याचे तुला जमणार
नाही जर कुठेही व्हायला 'कणखर'
प्रयोजन काय आहे नेमके
दुनियेत येण्याचे?
---------------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2611

निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे : विजय दि. पाटील

तुझ्या लक्षात ना आले जिथे
संकेत येण्याचे पुरावे कोणते
मीही तुला द्यावेत येण्याचे?
सदा डोक्यात करता घोळका नाना
विचारांनो जराही भान नाही का
तुम्हा रांगेत येण्याचे? तुला
कारण नसावे एकही टाळायला भेटी
निमित्ते लाख माझी रद्द
होण्या बेत येण्याचे मला माझा
बरा होता जरासा लांबचा रस्ता
निघाले अर्थ नाही ते तुझ्या
वाटेत येण्याचे तुला जमणार
नाही जर कुठेही व्हायला 'कणखर'
प्रयोजन काय आहे नेमके
दुनियेत येण्याचे?
---------------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

मावळाया लागलो : निशिकांत दे

उगवणे भाग्यात नव्हते
मावळाया लागलो वेदनांचे गाव
जिकडे मी उडाया लागलो ओळखीची
वाटली ती भेटता हसली तशी बालपण
मी ताण देउन आठवाया लागलो देव
कोणा पावलेला पाहिला नाही कधी
पण तरीही विठ्ठला मी आळवाया
लगलो देणग्या देऊन मोठ्या
स्वार्थ मीही साधला भूक माझी
मुखवट्याची भागवाया लागलो
उच्चभ्रू मीही असावे मोह पडता
वाटते शुध्द माझ्या आसवांना
बाटवाया लागलो ओंगळांना
झगमगाटी मध्यवर्ती स्थान अन
मी वृथा अंधार सारा पांघराया
लागलो तो पुढारी भेटता मज
भ्रष्ट झालो मी असा ! चावडीवर
लोकशाही नागवाया लागलो
भ्रष्ट नेता काल मरता जाहली
इतकी खुशी ! प्रेतयात्री मीच
हलगी वाजवाया लागलो संपली
यात्रा जगीची जाणले
"निशिकांत"ने भैरवीच्या आर्त
ताना आळवाया लागलो निशिकांत
देशपांडे मो.नं. :- ९८९०७ ९९०२३ E
Mail:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2610

Wednesday, April 6, 2011

मावळाया लागलो : निशिकांत दे

उगवणे भाग्यात नव्हते
मावळाया लागलो वेदनांचे गाव
जिकडे मी उडाया लागलो ओळखीची
वाटली ती भेटता हसली तशी बालपण
मी ताण देउन आठवाया लागलो देव
कोणा पावलेला पाहिला नाही कधी
पण तरीही विठ्ठला मी आळवाया
लगलो देणग्या देऊन मोठ्या
स्वार्थ मीही साधला भूक माझी
मुखवट्याची भागवाया लागलो
उच्चभ्रू मीही असावे मोह पडता
वाटते शुध्द माझ्या आसवांना
बाटवाया लागलो ओंगळांना
झगमगाटी मध्यवर्ती स्थान अन
मी वृथा अंधार सारा पांघराया
लागलो तो पुढारी भेटता मज
भ्रष्ट झालो मी असा ! चावडीवर
लोकशाही नागवाया लागलो
भ्रष्ट नेता काल मरता जाहली
इतकी खुशी ! प्रेतयात्री मीच
हलगी वाजवाया लागलो संपली
यात्रा जगीची जाणले
"निशिकांत"ने भैरवीच्या आर्त
ताना आळवाया लागलो निशिकांत
देशपांडे मो.नं. :- ९८९०७ ९९०२३ E
Mail:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, April 5, 2011

पडल्यापडल्या जागोजागी उसवत आहे : विजय दि. पाटील

काठी, परशू, भाला, सारे जमवत आहे
मी बेरड होण्याचे पक्के ठरवत
आहे माझ्या सज्जनतेची केवळ
चेष्टा झाली फांदेबाजी माझी
बक्षिस मिळवत आहे आयुष्याची
ऐरण झिजली असताना मी कुठल्या
विश्वासाने सळई बडवत आहे?
तकलादू धाग्यांनी विणले माझे
जीवन पडल्यापडल्या जागोजागी
उसवत आहे मी घाबरलो येथे येइल
त्या दु:खाला जो जो 'कणखर' झाला
तो तो मिरवत आहे -------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2606

Tech Te.. : Shashwat

Prashn Padayache Sarkhe Tech Te Tech te.. Uttarhi Ase ka kalena...Tech Te -
Tech Te.. Yethe mandla Bajar Mazyach Astitwacha Taplele kashe Bajaru Tech Te-
Tech Te?!! Baget Pratiksha Eka Ramya Gulbachi.. Rutnare Kate Ahech Tech Te -
Tech Te Vadali Hodis Asha Stabdh Kinaryachi.. Zombate Varre Achanak Tech Te
-Tech Te. Milavi Jagnyas Aata tari Kalatani.. Aajvari Sosun Zaale Tech Te
-Tech Te. He Kiti Kantalvane Zale Jagane Aata.!! Sakalpasun..Ratriparyant
Tech Te-Tech Te.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tu Jinklele Daav : Shashwat

Parajitanchya Yaadit tethe Pahilech Maze Naav Hote! Tu kiti Sahajpane te
Jinklele Daav Hote.........!!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/