तुझ्या लक्षात ना आले जिथे
संकेत येण्याचे पुरावे कोणते
मीही तुला द्यावेत येण्याचे?
सदा डोक्यात करता घोळका नाना
विचारांनो जराही भान नाही का
तुम्हा रांगेत येण्याचे? तुला
कारण नसावे एकही टाळायला भेटी
निमित्ते लाख माझी रद्द
होण्या बेत येण्याचे मला माझा
बरा होता जरासा लांबचा रस्ता
निघाले अर्थ नाही ते तुझ्या
वाटेत येण्याचे तुला जमणार
नाही जर कुठेही व्हायला 'कणखर'
प्रयोजन काय आहे नेमके
दुनियेत येण्याचे?
---------------------------------- विजय दिनकर
पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment