Friday, April 8, 2011

'प्याला' अर्धा भरला.... अर्धा रिकामा होता !! : supriya.jadhav7

'प्याला' अर्धा भरला.... अर्धा
रिकामा होता !! अट्टाहास
जिण्याचा मोठा दिवाणा होता...
'प्याला' अर्धा भरला.... अर्धा
रिकामा होता !! काय देवू उत्तरे,
गुलाबी तुझ्या पत्रांची...
'सिल-बंद' आयुष्य अन.... कोरा
लिफ़ाफ़ा होता !! नितीमुल्ये
कधीची... बासणात बांधलेली...
मुखवट्यांच्या राज्यात...सारा
दिखावा होता !! दाही दिशा भरकटे,
अस्थिर मनाचा तांडा ...
प्राजक्त आठवांचा....थोडा
विसावा होता !! स्वर्गातच
बांधतात गाठी म्हणे
लग्नाच्या... पदरी पडला
माझ्या...जळता निखारा होता !!
वारसा हक्कच जणू ! ...'राजपद'
श्रीमंतांचे.... कायदा मात्र
येथे....गरीब बिचारा होता !! भिक
नको मागू 'प्रिया' योग्य
न्याय-निवाड्याची... घडल्या
पाप-पुण्यांचा...'वरती' लिखावा
होता !! -सुप्रिया(जोशी)जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment